आईपासून बाळाला एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी कामा रुग्णालयाला पुरस्कार

कामा रुग्णालयाचा यात महत्त्वपूर्ण सहभाग असून मातांकडून बाळांना होणाऱ्या एचआयव्हीचं प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करतायेत. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने रुग्णालयाच्या या कामाचं कौतुक करण्यासाठी ‘पीपीटीसीटी’ केंद्राला सर्वोत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार देण्यात आलाय.

0
240
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे एचआयव्हीबाधित मातांकडून बाळांना होणारा एचआयव्हीचा संसर्ग १० टक्क्यांवरून दोन टक्के इतका कमी झालाय. मातांकडून बाळांना हा संसर्ग होऊ नये याकरता अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या कामा रुग्णालयातील Prevention of Parent to Child Transmission (पीपीटीसीटी) केंद्राला एड्स नियंत्रण मोहिमेत सर्वात्कृष्ट कामगिरी बजावत असल्याप्रकरणी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी(एमडॅक्स) आणि नॅकोतर्फे पुरस्कार देण्यात आला आहे.

Insert-3 (3)

पालिका उपायुक्त सुनील धामणे यांच्या हस्ते कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक व पीपीटीसीटी केंद्राच्या प्रमुख डॉ. राजेश्री कटके यांनी स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर व मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्या उपस्थित होत्या.

यासंदर्भात बोलताना डॉ. कटके म्हणाल्या की, “एचआयव्हीचा संसर्ग अनेक माध्यमातून होतो. असुरक्षित लैंगिक संबंध हे यामागील मुख्य कारण आहे. रक्त संक्रमणातूनही एचआयव्हीची लागण होते. तसंच एचआयव्ही बाधित मातांमुळे तिच्या होणाऱ्या बाळाला याचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. या अनुषंगाने नॅकोतर्फे २००२ मध्ये Prevention of Parent to Child Transmission (पीपीटीसीटी) कार्यक्रम सुरू केला होता. त्यानुसार २००३ मध्ये रुग्णालयात हे केंद्र सुरू करण्यात आलं. २००३ ते २०१७ या १४ वर्षांच्या कालावधीत १,०३,७७५ महिलांची तपासणी करण्यात आली. यात ७१,३१७ गरोदर महिला होता. या गर्भवती महिलांपैकी १,१७५ महिलांना एचआयव्ही असल्याचं निदान झालं. गेल्या पाच वर्षांत रुग्णालयात ३८० एचआयव्ही महिलांची प्रसूती करण्यात आली असून यापैकी फक्त १० मुलांना मातांकडून संसर्ग झाला होता. मागील अनेक वर्षांत हे प्रमाण खूपच कमी झालंय.”

Insert-4 (2)

डॉ. कटके पुढे म्हणाल्या की, आमच्याकडे येणाऱ्या महिलांची रक्त चाचणी केली जाते. यात एचआयव्ही असल्याचं निदान झाल्यास महिलेला प्रसूतीपूर्वी औषध सुरू केली जातात. जेणेकरून बाळाला संसर्गापासून दूर ठेवता येईल. शिवाय या महिलांना प्री-टेस्ट काऊंसिलिंग व प्रोस्ट टेस्ट काऊंसिलिंग केलं जातं. रोगप्रतिकारशक्ती वाढवणं आणि महिलेच्या मनात सकारात्मक विचार आणण्यासाठी यामाध्यमातून प्रयत्न केले जातात.”

रुग्णालयात कार्यरत केंद्रातील काम पाहून एड्सचं प्रमाण पाहण्यासाठी नॅकोतर्फे एड्स रुग्णांचे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात पाच वेळा कामा रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. २८ एप्रिल २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी कामा रुग्णालयातील या पीपीटीसीटी केंद्राला भेट देऊन कामाचं कौतूकही केलं होतं.

Insert-2 (6)

मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या उपसंचालिका डॉ. विद्या माने म्हणाल्या की, एचआयव्हीचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही काम करतोय. पण अद्यापही हे प्रमाण शून्यावर आलेले नाही. मातांकडून बाळांना होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण कमी होण्यासाठी विविध स्तरावरही प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून कामा रुग्णालयातील पीपीटीसीटी केंद्र अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतंय. त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या वर्षी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)