‘एसटी’ बस अॅम्ब्युलन्स बनते तेव्हा…

मंगळवारी दुपारी पुणे-बीड या ‘एसटी’ बसमध्ये एका प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बस ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत ‘एसटी’ कुठेही न थांबवता २६ किलोमीटर लांब बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणून उभी केली. पण, दुर्दैवाने त्या प्रवाशाचे प्राण वाचू शकले नाहीत.

0
98
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मंगळवारी दुपारी बीड जिल्ह्यातील नायगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक एक राज्य परिवहन मंडळाची ‘एसटी’ बस दाखल झाली. ’एसटी’ बस रुग्णालयाच्या आवारात पाहून डॉक्टर आणि इतर रुग्णही आश्चर्यचकित झाले. रुग्णालयाच्या आवारात बस, कोणालाच काही कळेना.

अचानक धावपळ सुरू झाली..बसमधल्या एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, दुर्दैवाने या व्यक्तीचा जीव वाचू शकला नाही.

ही घटना मंगळवारी घडली. बसमधले प्रवासी सय्यद जलील पुणे-बीड बसमधून प्रवास करत होते. पाटोदा तालुक्यातील नायगावच्या पुढे ही बस आली. अचानक सय्यद जलील यांना त्रास होऊ लागला. प्रवाशांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. बसचे ड्रायव्हर सी.टी.कदम यांनी कसलाही विचार न करता तातडीने बस पुन्हा नायगावच्या दिशने नेली. प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणत: दोन किलोमीटरवर होतं. कदम यांनी बस थेट आरोग्य केंद्रात थांबवली.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना सी.टी.कदम म्हणतात, “प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सय्यद यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितलं. अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. मग पुन्हा मी ‘एसटी’ बसमधूनच त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा रुग्णालयात दाखलंही केलं, पण तो दुर्दैवाने ते वाचले नाहीत.”

नायगावपासून बीडचं जिल्हा आरोग्य केंद्र २६ किलोमीटर लांब होतं. हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटांत पार करण्यात आलं.

सय्यद यांचा दुर्दैवाने जीव वाचला नाही. पण, ग्रामीण भागातील जनतेची लाईफ-लाईन ‘एसटी’ अॅम्ब्युलन्स बनून प्रवाशांच्या मदतीला धावली.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)