‘क्या आप का दिल टूटा है?’ मग हे वाचा

‘दिल टूटा गया’ हे हिंदी सिनेमांमध्ये वापरलं जाणारं सगळ्यात कॉमन वाक्य आहे. या ‘टूटे हुए दिल’ला सावरणं सोपं नसतं. या स्थितीतून कसं बाहेर पडायचं यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ केदार तिळवे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ तिळवे हे वाशी येथिल हिरानंदानी हॉस्पीटलमध्ये कंसल्टंट मानसोपचारतज्ज्ञ आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

‘दिल टूटना’ ही संज्ञा मानसिक आघाताचं वर्णन करण्यासाठी वापरली जाते. मानसिक आघातामागे कुठलंही कारण असू शकतं. स्वयंपाक करताना एखादा पदार्थ बिघडणं ते आवडती टीम मॅचमध्ये हरणं, परीक्षेत कमी गुण मिळणं यांसारख्या कुठल्याही कारणामुळे आपली मनस्थिती बिघडू शकते. त्यात ब्रेकअप सारख्या घटनांमुळे तर मानसिक आघाताची तीव्रता अधिकच वाढते. ब्रेकअपमधून बाहेर पडायला अधिक वेळ लागतो.

ब्रेकअप स्वत: केलं असेल किंवा समोरच्याने केलं असेल तरीही मनात विचारांचं काहूर उठतं. किती काळासाठी तुम्ही रिलेशनशिपमध्ये होतात, तुम्ही मनानं किती जवळ आले होतात, तसंच ब्रेक-अप कोणत्या कारणांमुळे झालं, यासगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ‘ब्रोकन हार्ट सिंड्रोमची’ लक्षणं अनेक जाणून घेऊ या.

 • नैराश्य
 • आत्मविश्वास कमी होणं
 • स्वत:ला दोष देणं
 • सारखं रडायला येणं
 • मानसिकदृष्ट्या थकल्यासारखं वाटणं
 • झोप न येणं
 • भुकेवर परिणाम होणं
IMG-20171026-WA0032
डॉ. केदार तिळवे

या मानसिक स्थितीमधून जर लवकर बाहेर पडला नाहीत तर त्याचे दुरगामी परिणाम होऊ शकतात. भविष्यात कुठल्याही रिलेशनशिपची भीती वाटू शकते. यावर उपाय म्हणून खालील गोष्टी केल्या जाऊ शकतात.

 • आयुष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रित करा
 • कितीही त्रास झाला तरी दैनंदिन आयुष्य सुरळीतपणे सुरु ठेवा
 • खोटं का असने ना.. पण हसा
 • रडावसं वाटलं तर रडा
 • तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवा
 • नवीन छंद जोपासा किंवा पाळीव प्राणी आणा
 • ब्रेकअपमधून धडा घ्या

याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की, मित्र, कुटुंबीय किंवा तज्ज्ञ यांच्याशी तुमच्या भावना शेअर करा. मनातल्या मनात कुढत बसू नका. आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आनंद आहे. तेव्हा सदैव आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter