स्तनांच्या आकाराने नाखूश महिला स्तनांची तपासणी टाळतात

ज्या महिलांना स्वतःच्या स्तनांना योग्यरितीने समजतात किंवा त्याचं परिक्षण करू शकतात त्या महिलांना स्तनांमध्ये झालेले बदल त्वरित लक्षात येतात. मात्र ज्या महिला स्तनांच्या आकाराने नाखूष असतात त्या स्तनांची तपासणी करण्यास टाळटाळ करतात असं नुकत्याचम एका संशोधनाच्या माध्यमातून लक्षात आलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, स्तनांच्या कर्करोगाची लक्षणं ओळखणं फार कठीण असतं. यासाठी त्याची लक्षणं समजून घेणं गरजेचं असतं. यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी घरच्याघरीच स्वतःच्या स्तनांची तपासणी करावी जेणेकरून काही बदल आढळल्यास त्यावर योग्य ते उपचार करता येतील. नुकतंच केलेल्या एका संशोधनानुसार, काही महिला स्वतःच्या स्तनांचा आकार छोटा असल्याने असमाधाऩी असतात. परिणामी या महिला याच कारणांमुळे स्तनांची तपासणी करण्यास टाळाटाळ करतात.

इंग्लंडच्या विरेन स्वामी ऑफ रस्किन युनिवर्सिटी आणि लंडनच्या युनिवर्सिटीतील प्राध्यापक अॅड्रीयान यांनी याबाबत संशोधन केलं. या संशोधनासाठी ३८४ महिलांचा समावेश करण्यात आलेला.

या संशोधनाच्या अखेरीस अभ्यासकांच्या असं लक्षात आलं की,

  • अनेक महिला स्वतःच्या स्तनांच्या आकारामुळे असमाधानी आहेत
  • यापैकी ३१ टक्के महिलांना स्तनांचा आकार छोटा हवा होता
  • तर ४४ टक्के महिलांना स्तनांचा आकार मोठा हवा होता
  • शिवाय ३३ टक्के महिलांच्या सांगण्यानुसार, त्या फार क्वचितचं स्तनांची तपासणी करतात
  • तर काही महिलांच्या म्हणण्यानुसार, स्तनांमध्ये बदल झालेला आढळला तर आम्ही त्वरित डॉक्टरांची मदत घेतो

या संशोधनानुसार, दहा पैकी एक महिला मान्य करते की, या कारणामुळे त्या डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात किंवा टाळतात.

ज्या महिलांना स्वतःच्या स्तनांना योग्यरितीने समजतात किंवा त्याचं परिक्षण करू शकतात त्या महिलांना स्तनांमध्ये झालेले बदल त्वरित लक्षात येतात.

या अभ्यासाचे प्रमुख लेखक स्वामी यांच्या सांगण्यानुसार, “आम्ही केलेल्या संशोधनात स्तनांच्या आकाराशी असमाधानी असण्याचा संबंध हा महिला स्तनांची तपासणी कमी प्रमाणात करतात याच्याशी आढळून आला. तसंच स्तनांचा आकाराने असमाधानी असणाऱ्या महिलांना ही गोष्ट लाजीरवाणी वाटते आणि त्या महिला डॉक्टरांना भेट देत नाहीत.”

हे संशोधन जर्नल बॉडी इमेजमध्ये प्रसिद्ध करण्यात आलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter