खुशखबर! अल्पवयीन मुलांना पालिका रूग्णालयात मोफत उपचार

मुंबईतील पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना पालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीत मंजूरी देण्यात आलीये. याचा गरीब आणि गरजू मुलांना नक्कीच फायदा होणारे.

BMC Headquarter Mumbai
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आता १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना पालिकेच्या रूग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळू शकणार आहेत. केद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांत मोफत उपचार सुविधा पोचवली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून तब्ब्ल १२.७९ कोटी रूपये इतका खर्च केला जाणारे. अनेक दिवसांपासून या प्रस्तावाचा विचार सुरु होता अखेर या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजूरी देण्यात आलीये.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना मुंबई महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या, “आर्थिक परिस्थिती बिकट असणार्‍या मुलांना पालक पालिका शाळांमध्ये शिकवतात. अशा स्थितीत मुलं आजारी पडल्यास पालकांकडे उपचारासाठी पैसे नसतात. याचा विचार करून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतील बालवाड्या, अंगणवाडी व पालिका शाळांमधील 18 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत उपचार देण्यात येणार आहे. यात औषधोपचाररांसह शस्त्रक्रियाही मोफत केल्या जातील.”

डॉ. केसकर म्हणाल्या की, “याआधी या मुलाच्या उपचारासाठी केवळ 10 रुपये घेतले जात होते. मात्र आता हे पैसे सुद्धा न घेता मोफत उपचार दिला जाणार आहे. अनेक दिवसांपासून सातत्याने या प्रस्तावाचा विचार सुरु होता. त्यानुसार आता स्थायी समितीने हा प्रस्ताव मान्य केलाय.”

एकात्मिक बाल विकास योजनेच्या आकडेवारीनुसार,

  • अंगणवाडीतील सहा वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या- 2,69,893.
  • आजारी किंवा कुठलाही वैद्यकीय दोष आढळलेली 18 वर्षांपर्यंतची मुलं- 3,85,976.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter