बाईक अॅम्ब्युलन्सद्वारे ४ महिन्यांत ८२३ रुग्णांवर उपचार

ऑगस्टमध्ये मुंबईत बाईक अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून चार महिन्यांत तब्बल ८२३ रूग्णांना त्वरित सुविधा पुरवण्यात आलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

गरजू रूग्णांना तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ऑगस्टमध्ये मुंबईत बाईक अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून चार महिन्यांत तब्बल ८२३ रूग्णांना त्वरित सुविधा पुरवण्यात आलीये. कोणत्याही रूग्णावर आपात्कालीन परिस्थिती आली की चारचाकी अॅम्ब्युलन्स येईपर्यंत या बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून रूग्णाला आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही अॅम्ब्युलन्स लाँच करण्यात आली. १०८ या क्रमांकाद्वारे निशुल्कपणे ही सुविधा पुरवण्यात येते.

शहरातील गर्दीच्या आणि दाटीवाटीच्या परिसरात बाईक अॅम्ब्युलन्सची सेवा अत्यंत उपयुक्त ठरते. मुंबईतील १० विविध ठिकाणी बाईक अॅम्ब्युलन्स सुविधा कार्यान्वित करण्यात आलीये. भांडुप, मानखुर्द, धारावी, नागपाडा, मालाड, चारकोप, गोरेगाव, ठाकूर विलेज, कलिना आणि खार दांडा या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलीये.

या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये एखाद्या रूग्णावर तात्काळ उपचार करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा प्रदान करण्यात आल्यात. ऑक्सिजन मास्क, एअर-वे कीट, सक्शन मशिन उपलब्ध आहेत. शिवाय स्ट्रोक, हृदय विकाराचा झटका, अस्थमा यांवरील औषधंही आहेत.

याविषयी महाराष्ट्र एमर्जेन्सी मेडिकल सर्व्हिसेसचे सीओओ डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्या सांगण्यानुसार, “बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे प्राण वाचवण्यास मदत झालीये. गोल्डन अवरमध्ये रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशावेळी ट्रॅपिकमध्ये बराच वेळ वाया जातो. असावेळी बाईक अम्ब्युलन्सच्या माध्यमातून रूग्णावर त्वरित उपचार करण शक्य होतं.”

बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून आतापर्यंत दिलेल्या सुविधा

आपात्कालीन परिस्थिती       संख्या

 

वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती ५९६
गरोदर महिला १७
अपघातांसंबंधी परिस्थिती ९६
इतर आपात्कालीन परिस्थिती १४१

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)