बीओए परिषदेत प्रथमच डॉ. तात्याराव लहाने ‘फ्री पेपर्स’ पुरस्काराचं वितरण

नेत्रतज्ज्ञ फोकस २०१७ परिषदेत पहिल्यांदाच नवोदित डॉक्टरांना पुरस्कार देण्यात आले. प्रतिष्ठित नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्यात आलाय. या पुरस्काराचं वितरण आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं.

बीओए परिषदेत प्रथमच डॉ. तात्याराव लहाने ‘फ्री पेपर्स’ पुरस्काराचं वितरण
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नेत्रतज्ज्ञांच्या मुंबईत सुरू असलेल्या तीन दिवसीय फोकस २०१७ परिषदेत यंदा प्रथमच ‘फ्री पेपर्स’ पुरस्कार जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या नावाने देण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या नवोदित डॉक्टरांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

फोकस २०१७च्या उद्घाटन सोहळ्यात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. शनिवारी डॉ. रणजित मणियार यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम फेरी संपन्न झाली.

डॉ. तात्याराव लहाने ‘फ्री पेपर्स’ पुरस्काराचं हे पहिलं वर्ष असून प्रियांका सिंग (२३४/३०० गुण) हिला प्रथम पुरस्कार रुपये ५१ हजार देण्यात आला. प्रियांका के. जे. सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकते. दुसरा पुरस्कार रुपये ३१ हजार रुपये मृतिका सेन (२३३/३०० गुण) हिला देण्यात आला. तर, तिसरा पुरस्कार रुपये २१ हजार खुशबू (२३२/३०० गुण) हिला देण्यात आला.

‘माय मेडिकल मंत्रा’शी बोलताना प्रथम पुरस्कार विजेती प्रियांका सिंग म्हणते, “आमच्या रुग्णालयात एक लहान मुलगा आला होता. त्याला डोळ्यांनी नीट दिसत नव्हतं. बहुतेक वेळा असे दोष आनुवंशिकतेतून येतात. पण या मुलाच्या बाबतीत असं काहीच नव्हतं.”

प्रियांका पुढे सांगते, “आम्ही केलेल्या तपासणीत हा दोष त्याच्या आई-वडिलांमुळे निर्माण झालेला दिसला. दोघांनी एकाच कुटुंबात लग्न केले होते. शेवटी मी या निष्कर्षावर आले की, एकाच कुटुंबात लग्न केल्याने दृष्टीमध्ये अशी विकृती निर्माण होऊ शकते.”

त्याचप्रमाणे प्रिया राय, मयांक आणि प्रियांका गांधी यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)