योगासनांचे शरीराला होणारे फायदे!

0
1624
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

योगासनामुळे मानवी शरीराला अनेक निरनिराळे फायदे होतात. योगाचे बरेच फायदे असून शरीराच्या व्याधी कमी होतात तसेच मानसिक स्थिती खंबीर होते. यामुळे रक्त संचलन प्रक्रिया सुधारते, पचनक्रिया आणि मानसिक शांतता आपल्याला लाभते. याचा राहणीमानात बदल होतो. आजकालची जीवनशैली धकाधकीची असल्याने मनुष्याला लगेच राग येतो तसेच त्याची चिडचिड देखील होते. आजकाल कॉलेजमधील युवकांची मनस्थिती बिघडत चालल्यामुळे मानसिक ताण देखील वाढत आहे. हेच मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासन महत्वाची भूमिका बजावते. योगासनाबरोबर आहार देखील तितकाच महत्वाचा आहे.

शरीर सदृढ राहण्यासाठी प्राणामय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश असे चार टप्पे महत्वाचे आहेत. योगासनामुळे फक्त शरीरासोबतचा मनाचाही विकास होतो. सकारात्मक विचार मनामध्ये निर्माण होऊन मानसिक ताण कमी होतो. परिणामी रागावर नियंत्रण येते आणि रोगापासून मुक्ती मिळते.

दररोज किमान अर्धा तास योगासनासाठी दिल्यास आपल्या संपूर्ण आयुष्यात बदल घडू शकतो. शिवाय श्वसनक्रिया करताना ओमकाराचा रोज अर्धा तास मंत्रघोष केल्याने मानसिक व शरीरिक स्वास्थ्य लाभू शकते. योगा करतेवळी श्वास सोडताना नकारात्मक विचार, वाईट गुण, व्देष, राग आणि शरीरातील वाईट बाहेर जावो असा विचार केला पाहिजे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter