जाणून घ्या सूर्यभेदन प्राणायमाचे फायदे

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

संस्कृतमध्ये सूर्य म्हणजे सन. योगमध्ये सूर्य म्हणजे पिंगला नाडी म्हणजे उजवी नाकपुडी. सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे पिंगला नाडीचं शुद्धीकऱण.

कसं कराल सूर्यभेदन प्राणायाम

  • पाठीचा कणा ताठ ठेऊन सरळ बसा
  • तुमचा डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा
  • उजव्या हाताची पहिलं आणि मधलं बोट भुवयांच्या मध्यभागी ठेवा. करंगळी आणि तिसरं बोटं डाव्या नाकपुडीवर तर अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा.
  • उजव्या नाकपुडीने श्वास घेताना डावी नाकपुडी बंद राहील. उजव्या नाकपुडीने श्वास गेऊन डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. डावी नाकपुडी बंद करून पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. आणि डाव्या नाकपुडीने सोडा.

फायदे

  • शरीरातील कृमी नष्ट होतात
  • या प्राणायमामुळे शरीरात उर्जा निर्माण होते

कोणी करू नये

हृदय रोग, उच्चरक्तदाब, पित्त, हायपर थायरॉईड आणि पोटात अल्सर असलेल्यांनी हे प्राणायाम करू नये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter