चवीला कडवट, आरोग्यासाठी गुणकारी मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, जाणून घेऊयात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मेथीचा लाडू खाणार का असं कोणी आपल्याला विचारलं तर त्या नावानंच आपलं तोंड कडू होतं. मेथीचा दाण्यांपासून बनवलेला हा लाडू कुणालाच आवडत नाही. गरोदर महिलेला हा मेथीचा लाडू आवर्जून दिला जातो. यामागचं नेमकं कारण काय आणि चवीला कडवड असलेल्या या मेथीच्या दाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, जाणून घेऊयात.

आईचं दूध वाढवण्यासाठी मदत होते

बाळासाठी आईचं दूध खूप महत्त्वाचं असतं. आईचं दूध वाढावं यासाठी मेथीचे दाणे फायदेशीर आहे.

14 दिवस करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार 77 मातांनी मेथीच्या दाण्यांचं सेवन केलं, त्यामुळे त्यांच्या दुधाची निर्मिती वाढली, त्यामुळे त्यांच्या बाळाचंही वजन वाढलं.

दुसऱ्या आणखी एका अभ्यासत 66 मातांचे 3 गट करण्यात आले. एका गटाला मेथीचे दाणे घातलेला चहा दिला, दुसऱ्या गटाला प्लेसेबो दिलं आणि तिसऱ्या गटाला काहीच दिलं नाही. मेथीच्या दाण्यांचं सेवन केलेल्या गटातील महिलांच्या स्तनातील दुधाचं प्रमाण काहीच न दिलेल्या गटापेक्षा 34 मिली जास्त आणि प्लेसेबो दिलेल्या गटापेक्षा 73 मिली जास्त होतं.

पुरुषांमधील सेक्स हार्मोन्स वाढतात

मेथीच्या दाण्यांचं सेवन केल्यानं पुरुषांमधील टेस्टोस्टेरो हे सेक्स हार्मोन्स वाढत असल्याचं संशोधकांना दिसून आलं आहे.

संशोधकांनी 8 आठवडे अभ्यास केला. 30 पुरुषांनी आठवड्याला 4 सत्र वेटलिफ्टिंग केलं आणि दर दिवशी 500 मिलीग्रॅम मेथीच्या दाण्याचं सेवन केलं

ज्या व्यक्तींनी मेथीच्या दाण्याचं सेवन केलं होतं, त्यांच्यामधील सेक्स हार्मोन्सची पातळी वाढली होती, तर ज्यांनी सेवन केलं नव्हतं त्यांच्यामधील सेक्स हार्मोन्सची पातळी कमी झाली होती.

दुसऱ्या एका 6 आठवड्याच्या अभ्यासातक 30 पुरुषांचं सर्वेक्षण करण्यात आलं. ज्यांनी 600 मिलिग्रॅम मेथीच्या दाण्याचं सेवन केलं होतं, त्यांची सेक्सची इच्छाही वाढली होती.

संशोधकांच्या मते, मेथीच्या दाण्याच्या सेवनामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि सेक्सची इच्छा वाढते.

मधुमेहींसाठी फायदेशीर

मेथीचे दाणे टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेही दोन्हींसाठी फायदेशीर ठरत असल्याचं संशोधकांना दिसून आलं आहे.

एका अभ्यासानुसार, टाईप 1 मधुमेह असलेले जे लोकं दुपारी आणि रात्रीच्या जेवणामुळे 50 ग्रॅम मेथीच्या दाण्याचं सेवन करत होते, 10 दिवसांनंतर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात होती आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी झाली होती.

दुसऱ्या एका अभ्यासात जे मधुमेही मेथीच्या दाण्याचं सेवन करत होते, त्याच्या 4 तासांनंतर त्यांच्या रक्ततील साखरेची पातळी 14.4 टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं.

मेथीचे दाणे इन्सुलिनचं कार्य सुधारत असतील त्यामुळे असं होत असावा असं संशोधकांनी म्हटलं आहे.

वजन कमी होतं

3 अभ्यासांमधून दिसून आलं आहे की मेथीच्या दाण्याच्या सेवनामुळे भूकेवर नियंत्रणात राहते, फॅटचं प्रमाण कमी होतं. एका 14 दिवसाच्या अभ्यासानुसार, जे लोक मेथीच्या दाण्याचं सेवन करतात त्यांच्यातील एकूण फॅट सेवनाचं प्रमाण 17 टक्क्यांनी कमी होतं.

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते

काही अभ्यासानुसार मेथीच्या दाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते, असं दिसून आलं आहे.

हार्ट बर्नवर फायदेशीर

प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेल्या 2 आठवड्यांच्या अभ्यासात हार्ट बर्नची समस्या असलेल्या व्यक्तींनी मेथीच्या दाण्याचं सेवन केल्यानंतर त्यांच्यातील हाराट बर्नची लक्षणं कमी झाली.

सोर्स – हेल्थलाईन

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter