चाळीशीनंतर ‘या’ सौंदर्यप्रसाधनांपासून राहा दूर

मात्र वय वाढल्यानंतर विशेषत: चाळीशीत काही सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळणं गरजेचं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मेकअप करणं प्रत्येक महिलेला आवडतं. जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतसं आपण सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी मेकअपचाच आधार घेतो. मेकअपमुळे आपलं वय जास्त झाल्यास दिसून येत नाही. मात्र वय वाढल्यानंतर विशेषत: चाळीशीत काही सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं वय जास्त झाल्यासारखं वाटेल.

अल्कोहोलयुक्त टोनर

सध्या बहुतेक टोनरमध्ये अल्कोहोल असतंच कराण तेलकट आणि पुरळ येणारी त्वचा लक्षात घेता हे टोनर बनवलेले असताता. असे टोनर जर तुम्ही चाळीशीतदेखील वापरले तर तुमची त्वचा आणखी कोरडी होईल. त्यामुळे त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी hyaluronic acid serum किंवा जेलचा वापर तुम्ही करू शकता. मात्र तुम्हाला टोनरच हवा असेल तर अल्कोहोलविरहित टोनर वापरा.

 लिक्विड आयलायनर

लिक्विड आयलानयनर जे पटकन सुकणारं असतं, ते तुमच्या वयोमानानुसार तुमच्या डोळ्यांवर हार्शर दिसू शकतं. तुमचे डोळे लहान आणि वयस्कर व्यक्तींप्रमाणे दिसतील. त्यामुळे तुम्ही जेल आयलायनरचा पर्याय निवडू शकता.

केकी कन्सिलर

जसं आपलं वय वाढतं तसं डोळे आणि तोंडाजवळील त्वचा पातळ होते. अशा ठिकाणी जर तुम्ही त्वचेवरील लाईन लपवण्यासाठी केकी कन्सिलर वापरत असाल, तर ते तुमच्या चेहऱ्यावर जास्त वाटू शकतं. त्यामुळे केकीऐवजी क्रिमी किंवा लिक्विड कन्सिलर वापरू शकता आणि कॉटनने टॅप करून जास्तीच कन्सिलर काढून टाका.

मेटालिक ब्लश

विशीत किंवा तिशीत मेटालिक ब्लश ठिक आहे, मात्र चाळीनंतर मेटालिक ब्लश शक्यतो वापरू नका. तुमच्या नैसर्गिक त्वचेला सूट होईल असा ब्लश वापरा ज्यामुळे तुमचं वय जास्त आहे हे दिसून येणार नाही.

फेस पावडर

फेस पावडर वापरण्याची सवय तर सोडूनच द्या. त्याऐवजी लिक्विड फाऊंडेशन वापरा, ज्यामध्ये प्रायमर आणि कन्सिलर आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील फाईन लाईन्स आणि रिंकल्स झाकले जातील.

वॉटरप्रुफ मस्कारा

आपलं वय वाढल्यानंतर आपले आयलॅशेस पातळ होतात. वॉटरप्रुफ मस्कारा लवकर निघत नाही आणि तो काढण्याच्या नादात तुमच्या पापणीचे केस खेचले जाऊ शकतात. त्यामुळे वॉशेबल असा मस्कारा वापरा.

 सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter