हळदीनं खुलवा सौंदर्य

जखम भरून काढणारी हळद सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील मदत करते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नववधू आणि वराला लग्नाच्या आधी हळद लावली जाते. हळदीमुळे नवरीचं सौंदर्य खुलते. हळद ही जशी जखम भरून काढते, तशी सौंदर्यदेखील खुलवते. त्वचा आणि केसांसाठी हळद खूप उपयुक्त आहे. हळदीचे फायदे काय आहेत जाणून घेऊयात.

त्वचा उजळते

हळदीत अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट घटक असतात ज्यामुळे त्वचा उजळते.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होतात

ज्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे आहेत, त्यांच्यासाठी हळद उपयुक्त आहेत. हळदीची पेस्ट डोळ्यांच्या खाली लावून काही काळ ठेवल्यानं डोळ्यांची सूज दूर होते, शिवाय काळसरपणाही दूर होतो.

केसातील कोंडा दूर होतो

डोक्याच्या त्वचेला खाज येत असेल किंवा कोंड्याची समस्या असल्यास त्यावर हळद फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईल आणि हळद यांचं मिश्रण केसांमध्ये लावावं आणि 20 मिनिटांनी केस शाम्पूनं धुवावेत.

मृत पेशी दूर होतात

त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यासाठी हळद उपयुक्त ठरते. हळद, पाणी आणि अपल सिडेर व्हिनेगर प्रत्येकी एक टीस्पून एकत्र करून त्वचेवर लावावं आणि 15 मिनिटांनी धुवावं.

पुरळ दूर करतं

पुरळ ही त्वचेची सामान्य समस्या आहे. हळद नैसर्गिक अँटिसेप्टीक म्हणून काम करते. त्वचेला हानीकारक असलेला बॅक्टेरियांना पसरण्यापासून रोखते. हळद आणि अपल सिडेर व्हिनेगर यांचं मिश्रण पुरळ असलेल्या भागावर लावालं, यात तुम्ही मधदेखील एकत्र करू शकता.

सोर्स – हेल्थ डायझेेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter