गुलाबी सौंदर्य देणारं गुलाबपाणी

गुलाबपाण्यात अँटि-बॅक्टेरिअल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटि व्हायरल घटक असतात. गुलाबपाणी त्वचा, डोळे, केस यासंबंधित सर्व समस्यांवर नैसर्गिक उपचार आहे.

क्रेडिट - मॅक्स पिक्सेल
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अनेक लग्नांमध्ये किंवा अनेक चित्रपटांमधील लग्नांमध्ये आपण पाहिलं असेल की, लग्नमंडपाच्या प्रवेशद्वारावर गुलाबपाण्यानं पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. गुलाबपाण्याचा सुगंध ताजा आणि मनमोहक असा असतो. गुलाबपाण्यात अँटि-बॅक्टेरिअल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटि व्हायरल घटक असतात. गुलाबपाणी त्वचा, डोळे, केस यासंबंधित सर्व समस्यांवर नैसर्गिक उपचार आहे, गुलाबपाण्याचे फायदे काय आहेत जाणून घेऊयात.

पुरळ

गुलाबपाणी हे तुरटीप्रमाणे काम करतं. गुलाबपाण्यामुळे त्वचेला आलेली सूज आणि त्वचेचा लालसरपणा कमी होतो. जास्त मोठे पुरळ असल्यास त्यावर गुलाबपाणी लावणं फायदेशीर आहे. तसंच गुलाबपाणी, चंदन, लिंबूरस एकत्रित करून पुरळ आलेल्या भागावर राहिल्यास पुरळचे व्रणही दूर होतात.

त्वचेचं इन्फेक्शन

तेलकट त्वचा, डर्मेटायटिस, कोरडी त्वचा, एक्झेमा आणि स्किन इन्फ्लेमेशन अशा त्वचेच्या समस्यांवर उपचार म्हणून गुलाबपाणी वापरू शकता. गुलाबपाण्यामुळे त्वचेची एखादी जखमदेखील बरी होते. सनबर्न झालं असेल, तर अंघोळीच्या पाण्यात गुलाबपाण्याचे

डोळ्यांचा थकवा

डोळे थकलेले असतील तर कापड गुलाबपाण्यात बुडवून ते डोळ्यांवर ठेवावं, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. डोळे शांत आणि थंड होतात, ज्यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो. काही थेंब टाकून अशा पाण्यानं अंघोळ करा किंवा गुलाबपाणीही त्या भागावर हळुवारपणे लावू शकता.

केसांच्या समस्या

शाम्पू आणि केसांच्या इतर उत्पादनांमध्ये गुलाबपाणी हा महत्त्वाचा घटक असतो. गुलाबपाण्यामुळे डोक्याची त्वचा मुलायम होते, रक्तप्रवाह सुधारतो, केसांची वाढ होतं, केसांची मुळं मजबूत होतात. डोक्याची त्वचा थंड राहण्यास मदत होते. नैसर्गिक हेअर स्प्रे म्हणून गुलाबपाण्याचा वापर करू शकता. यामध्ये कोणतेही कृत्रिम घटक नसतात ज्यामुळे केसगळतीपासूनही संरक्षण मिळतं. केस दुभंगणे, कोरडे होणे या समस्याही दूर होतात.

किटक चावल्यास

डास किंवा इतर किटकांनी चावल्यानंतर त्वचेला खाज सुटते. अशावेळी त्या भागावर गुलाबपाणी लावल्यास थंडावा मिळतो, तसंच सूज कमी होते आणि खाजही दूर होते.

सुगंध

सुंगधी असं गुलाबपणी नैसर्गिक अत्तर म्हणून ओळखलं जातं. रूम फ्रेशनर्स, शाम्पू आणि साबणामध्येही याचा वापर केला जातो. अंघोळीनंतर जर गुलाबपाणी अत्तर म्हणून वापरल्यास तुमच्या शरीराला दुर्गंधी येत नाही आणि तुम्हाला ताजंतवानंही वाटतं, याशिवाय जास्त घामही येत नाही.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter