आंब्याने खुलवा सौंदर्य

वर्षातून एकदाच मिळणाऱ्या आंब्याची चव कधी चाखायला मिळते याची आतुरता प्रत्येकाला असते. चवील गोड आणि रसाळ असलेला आंबा सौंदर्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आंब्यातील घटकामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
 1. आंब्यातील व्हिटॅमिन ए व्रण आणि डाग दूर करतं तसंच चेहराही उजळतो.
 2. एक टीस्पून आंब्याचा गर आणि अर्धा टीप्सून मध, दूध एकत्र केल्यास हे नैसर्गिक ब्लॅक हेड रिमुव्हर म्हणून काम करतं.
 3. व्हिटॅमिन ए आणि सी हे आंब्यातील अँटी-एजिंग घटक आहेत. यामुळे फाईन लाईन्स आणि रिंकल्सची समस्या कमी होते.
 4. आंब्याचा गर 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावर चोळल्यानं चेहरा उजळतो.
 5. आंब्याच्या साली सूर्यप्रकाशात सुकवून त्याची पावडर बनवा. या पावडरमध्ये दही मिक्स करा आणि हे मिश्रण डार्क स्पॉटवर लावा.
 6. आंब्याच्या फोडी पाण्यात उकळून घ्या, हे पाणी नैसर्गिक अस्ट्रिंजेंटप्रमाणे काम करेल, ज्यामुळे पुरळ बरं होण्यास मदत होईल.
 7. आंब्याचा गर आणि गव्हाचं पीठ एकत्र करून त्यानं त्वचेवर मसाज करा, यामुळे त्वचेवरील छिद्रे स्वच्छ होऊन ती खुली होतील.
 8. आंब्याचा गर, बदाम पावडर आणि दूध हे घरगुती फेशिअल वॉशप्रमाणे काम करेल, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होईल.
 9. आंब्याचा गर, दूध, ओट्स आणि बदाम पावडर यांचं मिश्रण त्वचेवरील मृत पेशी दूर करतं आणि तुमच्या चेहऱ्याचा निस्तेजपणा दूर होतो. चेहऱ्यावर तेज येतं.
 10. आंब्याचा गर, ओट्मिल आणि मध समप्रमाणात एकत्रित करून हे मिश्रण संवेदनशील त्वचेसाठी फेस मास्क म्हणून वापरता येऊ शकतो.
 11. आंब्याचा गर, 1 टीस्पून दही आणि 2 अंड्यातील पिवळा बलक एकत्र केल्यास केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर तयार.
 12. आंब्यातील व्हिटॅमिनि ए केसातील कोंडा कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे आंब्याचा गर काही वेळ डोक्याच्या त्वचेवर चोळा. यामुळे फक्त कोंड्याची समस्याच दूर होणार नाही, तर तुमचे केसही चमकदार होतील.
 13. आंब्याच्या कोयीच्या आतील भाग आणि खोबरेल तेल यांचं मिश्रण नियमित केसांवर लावल्यानं पांढऱ्या केसांची समस्या दूर राहते.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter