हाडांना मजुबती देणारं दूध तुम्हाला बनवले सुंदर

दूध हे जसं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसंच सौंदर्यासाठीदेखील आहे.

0
2853
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दूध हे पूर्णान्न म्हटलं जातं. दूध आरोग्यासाठी जितकं फायदेशीर आहे तितकंच सौंदर्यासाठीदेखील फायदेशीर आहे. सौंदर्य खुलवण्यासाठी दुधाचा वापर करू शकता. दुधाचे सौंदर्यासाठी नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

फेशिअल क्लिनझर

अनेक फेशिअल क्लिनझरमध्ये असे घटक असतात ज्यामुळे संवेदनशील त्वचेला हानी पोहोचू शकते. तसंच यामध्ये रसायनंदेखील असतात ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठतात. मात्र दूध हा सौम्य असा फेशिअल क्लिनझर आहे. यामुळे नैसर्गिकरित्या त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ दूर होते शिवाय काही दुष्परिणामही होत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर एका कापसाच्या बोळ्यानं दूध लावा आणि कोमट पाण्यानं चेहरा धुवा.

स्किन मॉईश्चरायझऱ

कोरडेपणा, खाज आणि फायइ लाईन्स या सर्व तुमची त्वचा मॉईश्चर नसल्याची लक्षणं आहेत. दूध हे नैसर्गिक आणि कमी खर्चिक असं मॉईश्चरायझर आहे. कोरड्या त्वचेवर कापसाच्या बोळ्यानं दूध लावा आणि काही मिनिटांनी धुवा. तुम्ही दुधासोबत केळंदेखील वापरू शकता जेणेकरून तुमची त्वचा मुलायम होईल.

डेड स्किन रिमुव्हर

दुधामध्ये नैसर्गिकरित्या सौम्य असं असिड असतं. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यात आणि त्वचेला उजाळा देण्यात दूध फायदेशीर आहे. जास्त फायदा दिसून येण्यासाठी दुधात रॉ ओटमिल किंवा ब्राऊन शुगर मिक्स करू शकता आणि त्वचेवर लावू शकता. या नैसर्गिक डेड स्किन रिमुव्हरमुळे त्वचेला हानीदेखील पोहोचत नाही.

डार्क स्पॉल लायटर

उन्हामुळे त्वचेवर डार्क स्पॉट आल्यास दूध उपयुक्त आहे. दुधात सौम्य असिड असत, त्यामुळे ही समस्या दूर होते. दूध आणि बटाट्याचा रस समप्रमाणात घ्या. झोपण्यापूर्वी हे मिश्रण त्वचेवर लावा.

स्किन टोनर

दूध हे टोनरप्रमाणे काम करतं यामुळे त्वचेच्या आतील डर्ट बाहेर येतं याशिवाय त्वचेवरील छिद्र मोठी झालेली असल्यास तीदेखील छोटी होतात. कच्च दूध थंड असताना चेहऱ्यावर लावावं याचा परिणाम दिसून येईल.

फूट रिलॅक्सर

दिवसभरात थकल्यानंतर पायांना आराम मिळावा यासाठी फूट रिलॅक्सर म्हणून दूध फायदेशीर आहे. ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी 1 लीटर कोमट पाण्यात 2 कप गमर दूध, 4 टिस्पून मीठ आणि शाम्पूचे काही थेंब टाका आणि यामध्ये काही मिनिटं पाय बुडवून ठेवा.

कंडिशनर

बाजारातून आपण अनेकदा मिल्क असलेले असे कंडिशनर घेतो. मात्र त्यापेक्षा तुम्ही नैसर्गिक कंडिशनर म्हणून दुधाचा वापर करू शकता. दही, मेयोनीज आणि कच्च दूध एकत्र करून हे मिश्रण केसांवर लावून थोडा मसाज करा आणि त्यावर शॉवर कॅप घाला. 30 ते 40 मिनिटांनी केस धुवा.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter