पुरेशी झोप न मिळाल्यानं ‘हे’ दुष्परिणाम होतात

शांत झोप लागणं हे सुखी माणसाचं लक्षण मानलं जातं. आयुष्य सुखाने घालवायचं असेल तर शांत झोपेसोबतच पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे. नाहीतर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी झोप आवश्यक असते. आजकालच्या जीवनशैलीमुळे पुरेशी झोप मिळणं कठीणच असतं. मात्र चांगल्या आरोग्यासाठी किमान सात ते आठ तासांची झोप मिळणं आवश्यक आहे. काही जणांना नाईट शिफ्टमध्ये काम कऱण्याची सवय असते मात्र, ही सवय आरोग्यासाठी फार घातक ठरू शकते. जर आपल्याला पुरेशी झोप मिळत नसेल किंवा झोप पूर्ण होत नसेल तर त्याचा आरोग्यावर फार विपरित परिणाम होतो.  

अस्वस्थपणा

अनेकवेळा आपली झोप पूर्ण होत नाही. यामुळे दुसऱ्या दिवशी अस्वस्थता आणि विनाकारण चिडचिड जाणवते. जर शरीराला पुरेसा आराम आणि झोप मिळाली नाही तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या भावनांवर होतो. शिवाय सातत्याने मूड बदलत राहतो.

स्मरणशक्तीवर परिणाम

अपुऱ्या झोपेचा परिणाम हा अनेवेळा स्मरणशक्तीवर होताना पाहायला मिळतो. झोप पूर्ण झाली नाही की कोणतंही काम करतेवेळी मेंदूवर जास्त ताण द्यावा लागतो. अनेवेळा काही गोष्टी देखील आठवत नाहीत.

लठ्ठपणा

व्यक्तीला हवी तेवढी झोप न झाल्यास शरीरावर त्याचा हमखास परिणाम होतो. झोप झाली नाही की अन्नाचं योग्यरित्या पचन होत नाही. शिवाय वारंवार भूक लागत राहते. त्यामुळे आपल्याला अवेळी खाण्यचीही सवय लागते. परिणामी लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.

पोटाचे आजार

झोप पूर्ण झाली नाही की, पचनासंबंधीचे आजार उद्भवतात. पचनक्रियेत बिघाड झाला की अनेक पोटाचे विकार जाणवू लागतात. त्यामुळे व्यक्तीला पुरेशी झोप गेणं महत्त्वाचं आहे. अनेकांना यामुळे मायग्रेनचा त्रास देखील जाणवतो.

रोगप्रतिकारकशक्तीचा अभाव

संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीची गरज असते. मात्र जर पुरेशी झोप झाली नसेल तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)