‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग

केंद्राने आयुष सेवांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरात ‘राष्ट्रीय आयुष मिशन’ राबवलं जातंय. राज्यातील जिल्ह्यास्तरावरील लोकांमध्ये आयुर्वेद आणि युनानी औषधांसंदर्भात जागरूकता निर्माण करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे.

0
6079
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आयुर्वेदिक, होमिओपॅथी, योगा आणि युनानी या औषधांचा प्रसार व्हावा, यासाठी केंद्र सरकारने 2017मध्ये राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी केंद्राने आयुष सेवांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्यभरात ‘राष्ट्रीय आयुष मिशन’ राबवलं जातंय. राज्यातील जिल्ह्यास्तरावरील लोकांमध्ये आयुर्वेद आणि युनानी औषधांसंदर्भात जागरूकता निर्माण करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे.

या अभियानाद्वारे आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी यांसारख्या प्राचीन काळीन औषधांचा लोकांनी अधिकाधिक वापर करावा, याबाबत जागरूक केलं जाणार आहे.

आयुष मंत्रालयाद्वारे हे राष्ट्रीय आयुष अभियान राबवलं जातंय. राज्यात गरजू रुग्णांना मॉर्डन मेडिसिनसह आयुर्वेद आणि युनानी औषध उपलब्ध करून देणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. शिवाय ग्रामीण भागातील जिल्हास्तरावर स्वतंत्र आयुष रुग्णालय आणि दवाखाने सुरू करणं, आयुर्वेदिक महाविद्यालय उघडणं, प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुर्वेद आणि युनानी औषध उपलब्ध करणं हा सुद्धा उद्देश आहे.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यक्रमाचे सहाय्यक संचालक आणि आयुष प्रोग्राम प्रमुख डॉ. उमेश तागडे म्हणाले, “राज्यस्तरावर ही आयुष मिशन योजना राबवली जातेय. यासंदर्भात नुकताच केंद्राकडून 50 कोटींचा निधी मंजूर झाल्यानं आता या योजनेला सुरूवात झालीये. राष्ट्रीय आयुष मिशनची चार गटात विभागणी करण्यात आलीये. यात आयुष आरोग्य सेवा, आयुष मेडिकल कॉलेजची उभारणी करणं, आयुष औषधांची मानकं ठरवणं (Drugs quality control), शेतकऱ्यांना औषधी आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यास प्रोत्साहन देणं याचा समावेश आहे.”

“वाढत्या लोकसंख्येनुसार आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार वाढला तरीही वनऔषधींची लागवड करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अपशयी ठरलंय. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांसाठी ज्या वनौषधी लागतात, त्या दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालल्याने या औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे आता राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांद्वारे औषधी वनस्पतींची लागण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतायत. या कार्यक्रमाद्वारे विविध उपक्रमही राज्यभरात राबवण्यात येतायत. यामध्ये मानसिक आजार वाढत असल्याने 10 ऑक्टोबरला जिल्हास्तरावर 30 हजारांहून अधिक लोकांना विपक्षणा संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय आयुष मिशनद्वारे विपक्षणेचे प्रशिक्षण देण्यात आले होते” असंही डॉ. तागडे यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter