दातांची काळजी घेण्याच्या आयुर्वेदिक टीप्स

दात घासण्यासाठी कुठल्या पदार्थांचा वापर केल्यास दातांना मजबूती मिळेल आणि मौखिक आरोग्य सुदृढ राहिल याविषयी आयुर्वेदानं तपशीलात मार्गदर्शन केलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दातांची काळजी कशी घ्यावी याविषयी आयुर्वेदात बारकाईनं मार्गदर्शन करण्यात आलं आहे. दातांचं आरोग्य राखल्यास, संपूर्ण शरीराचं आरोग्य राखण्यास मदत होते. दररोज दात घासणं हे शरीर स्वास्थ्यासाठी गरजेचं आहे. यामुळे अनेक रोगांना लांब ठेवण्यास मदत होते. झोपल्यावर लाळेमधून स्रवणारे घटक तसंच, श्वासोच्छवासाने हवेमधले घटकही दातांच्या सभोवताली साठतात. निरोगी आरोग्यासाठी हे घटक काढून टाकणं निकडीचं आहे.

दातांचा आणि पचनाचा घनिष्ठ संबंध आहे. नीटपणे चावलेल्या अन्नाचं पचन सुलभपणे होतं. अन्न नीट चावता येण्यासाठी दातांची मुळं घट्ट असणं गरजेचं आहे. त्यासाठी दातांना मजबूत करणाऱ्या पदार्थांचा वापर करुन दात घासणं फायद्याचं ठरतं. दात घासल्यावर तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेमुळे पचनाची क्रिया सुरळीत पार पडते. त्यामुळे सकाळी उठल्यावर दातांची योग्य पद्धतीनं स्वच्छता करणं आवश्यक आहे.

दातांच्या आरोग्यावर आहार, दिनचर्या आणि व्यसनं यांचा परिणाम होतो. दातांची योग्य निगा न राखल्यास अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे दातांचं आरोग्य बिघडू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे.

दात खराब का होतात?

–    एकाच वेळी थंड आणि गरम पदार्थांचं सेवन केल्यानं दात ढिले होतात.

–    तंबाखू, पान, सिगरेट या व्यसनांमुळे दातांवर किटण साचतं.

–    दात कोरण्याच्या सवयीमुळे हिरड्यांमध्ये जखम होते.

–    जोरात घासल्यानं हिरड्या सोलवटतात

दात घासण्यासाठी कुठल्या पदार्थांचा वापर केल्यास दातांना मजबूती मिळेल आणि मौखिक आरोग्य सुदृढ राहिल याविषयी आयुर्वेदानं तपशीलात मार्गदर्शन केलंय.

दात घासण्यासाठी या पदार्थांचा वापर करा

–    त्रिफळा चूर्णात दोन थेंब तिळाचं तेल घातलेलं मिश्रण

–    तिळाची पूड, ज्येष्ठमधाची पूड आणि तिळाचं तेल एकत्र करून बनवलेली पेस्ट

–    बकुळ, बाभूळ, करंज, वड, लिंब, आणि त्रिफळा यांचं समभाग घेऊन बनवलेलं चूर्ण

–    बकुळ सालीपासून बनवलेलं चूर्ण

–    निंबसालीची पावडर

–    रुई, वड, खदिर, करंज यांच्या काड्या ब्रश करण्यासाठी चावा

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter