आयुर्वेदिक उपचार दूर करेल तुमची चिडचिड

चिडचिडेपणाचे आपल्या शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात. चिडचिडेपणावर मात करण्यासाठी आयुर्वेदातील उपाय करणे फायदेशीर ठरेल. चिडचिडेपणावर आयुर्वेदामध्ये फार चांगले उपचार दिले आहेत.

0
3292
सोर्स- Bryan Franklin
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या मनाविरूद्ध घडलेल्या गोष्टींचा आपल्याला लगेच राग येतो आणि मग आपण चिडचिड करू लागतो. तसेच नैराश्य आणि अतिताणामुळे चिडचिडेपणा वाढण्यास मदत होते. चिडचिडेपणा हा प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास त्याचे दुष्परिणाम शरीर आरोग्य, सामाजिक संबंध तसेच नातेवाईकांमधील संबंध यांच्यावर दिसून येतात.

चिडचिडेपणाची कारणे

– डोकेदुखी

– दातदुखी

– संधीवात

– पोट जड होणे

– पोट साफ न होणे

– वाढलेले वजन

– थायरॉईडचे विकार

– अति थकवा येणे

चिडचिडेपणाचे आपल्या शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात. चिडचिडेपणावर मात करण्यासाठी आयुर्वेदातील उपाय करणे फायदेशीर ठरेल. चिडचिडेपणावर आयुर्वेदामध्ये फार चांगले उपचार दिले आहेत.

चिडचिडेपणावर आय़ुर्वेदिक उपचार

चिडचिडेपणावर आयुर्वेदिक उपचार करताना आपल्या शरीरासंबंधी असणाऱ्या इतर तक्रारींची देखील माहिती घेतली जाते. त्यावर सखोल अभ्यास करून उपचार केला जातो.

औषधी उपचार

आय़ुर्वेदात असमार अश्वगंधा, जटामांसी, शंखपुष्पी, ब्राम्ही इत्यादी गोष्टी तसेच अभ्रक, माक्षिका, रौप्यभस्म या गोष्टी एकत्रीत करून बनवली जाणारी औषधे पोटात घेण्यासाठी दिली जातात.

तसेच या उपचारांच्या जोडीला ध्य़ान, नामस्मरण, संकीर्तन, प्राणायम तसेत योगासने अशा गोष्टी देखील उपयोगी ठरतात

पंचकर्म

पंचकर्म ही आयुर्वेदामधील एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा मानली जाते. या पंचक्रममध्ये एखादा रोग बरा करण्यासाठी एक विशिष्ट औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

चिडचिडेपणाच्या त्रासामध्ये विविध औषधी तेलाने हेडमसाज, शरीराला अभ्यंग, औषधी तेल नाकात टाकून नस्यकर्म, शिरोधारा असे विविध उपचार केले जातात. काही वेळा गरज असल्यास बस्ती, निरूह बस्ती तसेच विरेचन यांचाही उपयोग केला जातो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter