आयुर्वेद वंध्यत्व आणि उपचार

मूल होत नसेल तर डॉक्टर आयव्हीएफची मदत घेण्यास सांगतात. मात्र आयुर्वेदीक डॉक्टरांच्या मते वंध्यत्वावर आयुर्वेदातही उपचार आहेत. गर्भातील बाळाच्या उत्तम वाढीसाठी देखील आयुर्वेदात औषधं आहेत. आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी यांच्याशी माय मेडिकल मंत्राने या दोन महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधला.

0
372
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

माय मेडिकल मंत्रा: वंध्यत्वावर आयुर्वेदात उपचार आहे का?

डॉ. मधुरा कुलकर्णी: सध्या वंध्यत्वांचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. मूल न होणाऱ्या जोडप्यांना डॉक्टर आयव्हीएफ उपचारपद्धतींचा वापर करण्यास सांगतात. लग्नानंतर अनेक वर्ष झाल्यानंतर स्वतःचं मूल हवं म्हणून आयव्हीएफ आणि विकसीत उपचार पद्धतींचा वापर केला जातो. पण आयुर्वेदातही वंध्यत्व दूर करण्याचे उपचार आहेत. ज्या महिलांना मूल होत नाही अशा महिलांसाठी आयुर्वेदातील औषध मॉड्यूल म्हणून काम करत आहे. पारंपारिक औषधांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपचारांपेक्षा आयुर्वेदिक उपचारांचा वंध्यत्वावर चांगला परिणाम दिसून येतोय.

माय मेडिकल मंत्रा: आयुर्वेदात वंध्यत्वावर कशाप्रकारे उपचार केले जातात?

डॉ. मधुरा- गर्भधारणा ही स्त्री आणि पुरुष यांच्या आरोग्यावर स्त्रीबीज, शुक्राणू, बीजांड आणि गर्भाशयाच्या आरोग्यावर अवलंबून असते. काही महिलांच्या गर्भाशयाच्या नळ्या आकुंचन पावलेल्या असतात. त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात. अशावेळी महिलांवर पाच प्रकारे उपचार केले जातात. महिलेचा आहार पौष्टीक असला पाहिजे, विहार (जीवनशैलीतील बदल), कुटुंबातील वातावरण सकारात्मक ठेवले पाहिजे, पंचकर्म आणि औषध (रसायन). या महिलांना दोन प्रकारे हे रसायन दिले जातं. एक तोंडावाटे तर दुसरं हे औषध गर्भाशयाच्या मुखातून आत सोडले जाते. यामुळे गर्भाशयाचे बंद झालेले मुख उघडते. आणि गर्भधारणा होते.

माझ्याकडे उपचारासाठी आलेल्या एका महिलेला अनेक वर्षांपासून मुलं होत नव्हतं. माझ्याकडे आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात ती गरोदर राहिली असून काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

माय मेडिकल मंत्रा: गर्भवती असताना आयुर्वेदिक उपचार किती फायदेशीर आहेत?

डॉ. मधुरा- गर्भवती महिलांसाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महिलेचं आरोग्य (शारीरिक, मानसिक व सामाजिक), बाळाचं आरोग्य (भावनिक, गुणवत्त, बुद्धिवंत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी), बाळाला स्तनपान देण्यासाठी मातांना चांगल दूध यावे याकरता आयुर्वेदात विविध उपचारपद्धती आहेत. यात व्यायाम व योगाचे प्रकारही महिलांना शिकवले जातात. यामुळे गर्भातील बाळाची वाढ योग्य पद्धतीने होते. गर्भावर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम होत नाही.

माय मेडिकल मंत्रा: अनियंत्रित मासिक पाळीवर आयुर्वेदात उपचार आहेत का?

डॉ. मधुरा- नक्कीच, सध्या अनेक महिलांच्या मासिक पाळी अनियमित असते. काहींना पीसीओडीची समस्या उद्भवते. यावरही आयुर्वेदात उपचार उपलब्ध आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter