आयुर्वेद दूर करेल तुमच्या डोळ्यांवरील ताण

सध्या सर्व कामं कॉम्प्युटरवर आधारित आहेत. त्यामुळे दिवसातील बहुतेक वेल आपला कॉम्प्युटरवर जातो आणि त्यामुळे डोळ्यांनादेखील त्रास होतो. डोळ्यांवर येणारा हा ताण आयुर्वेदानुसार कसा दूर करावा याबाबत आयुर्वेदिय नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निखिल माळी यांनी मार्गदर्शन केलं आहे.

0
1322
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आयुर्वेदातील दिनचर्येचे पालन केले तर आपली सर्व इंद्रियं आणि पूर्ण शरीर दृढ बनते. आयुर्वेदामध्ये नमूद केलेल्या या सखोल गोष्टींचे पालन केल्यास डोळ्यांचे आरोग्य टिकून व्याधीक्षमत्व वाढण्यास मदत होते. तर जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे डोळ्यांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि डोळे निरोगी राहू शकतील.

झोप – व्यवस्थित झोप घ्या. शक्यतो रात्री जागरण आणि दिवसाची झोप टाळा. यामुळे डोळ्यावर दूरगामी विपरीत परिणाम होतो.

नेत्रसेचन – सकाळी दात घासल्यानंतर तोंडामध्ये पाणी भरून डोळ्यांवर पाणी शिंपडावे आणि नंतर तोंडातील पाणी थुंकून द्यावे. यामुळे डोळ्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते. इतर वेळीही अशी कृती करण्यास काहीच हरकत नाही.

अंजन – वैद्यकीय सल्ल्याने डोळ्यांसाठी हितकर असे अंजन (काजळ) घालावे. त्यामुळे डोळ्याचे आरोग्य टिकून राहते.

नस्य – औषधीसिद्ध तेल किंवा तुपाने नाकामार्गे औषध सोडावं यामुळे सर्वच इंद्रियांचे पोषण होते.

अभ्यंग – दिवाळीच्या दिवशी केले जाणारे अभ्यंग खरं तर दररोज करायला हवं. पण शक्य नसल्यास डोक्याला आणि तळपायाला तेल लावावं.

गरम पाणी टाळा – अंघोळ करताना डोक्यासाठी आणि डोळ्यांसाठी गरम पाण्याचा वापर टाळावा

योग्य पादत्राणे – तळपायांची विशेष काळजी घेतल्यास डोळ्यांचं आरोग्य अबाधित राहतं. त्यासाठी तळपायांना त्रास न होणारे पादत्राणे घालावी. पाय व्यवस्थित धुवावेत.

आहार – आपला आहार व्यवस्थित ठेवा. भूक मारू नका. उगीचच उपवास करू नका. योग्य वेळी आहार घ्या.

थोडा ब्रेक – कॉम्प्युटरसमोर काम करत असताना योग्य वेळाने विश्रांती घेऊन तळहात एकमेकांवर घासून बंद डोळ्यावर ठेवावेत यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. उन्हातून फिरताना डोळ्यांना विशेष संरक्षण द्यावे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter