रात्रीचं जेवण नेमकं कसं असावं?

सकाळच्या ब्रेकफास्टप्रमाणेच रात्रीचं जेवणही खूप महत्त्वाचं आहे. रात्रीचं जेवण कसं असावं, याबाबत आयुर्वेदात काही टीप्स देण्यात आल्यात

0
4603
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दिवसाच्या सुरुवातीला ब्रेकफास्ट करणं जितकं गरजेचं आहे, तितकंच रात्रीचं जेवणही खूप गरजेचं आहे. रात्रीच्या जेवणामुळे वजन वाढतं अशा गैरसमजातून अनेक जण रात्रीचं जेवण करणं टाळतात. मात्र असं करू नका. मात्र रात्रीच्या जेवणावेळी विशेष काळजी घ्या. ज्यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहिल. आयुर्वेदात रात्रीच्या जेवणात काय खावं आणि काय टाळावं याबाबत सांगण्यात आलंय.

रात्रीच्या जेवणावेळी या गोष्टी करा

गरम पाणी प्या

रात्रीचं जेवण करताना जेवणादरम्यान जास्त पाणी पिऊ नका. मात्र जेवणाच्या एका तासानंतर गरम पाणी पिणं खूप फायदेशीर आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीरातील अतिरिक्त गॅस दूर होतो.

हळद घातलेलं दूध प्या

रात्री दूध पित असाल, तर त्यात थोडीशी हळद घाला. त्यामुळे श्वसनासंबंधीची समस्या कमी होते. हळद बॅक्टेरियांशी लढते त्यामुळे शांत झोप लागते.

मसाल्यांचा समावेश करा

दालचिनी, मेथी, वेलची यासारख्या मसाल्यांचा रात्रीच्या जेवणातील खाद्यपदार्थांमध्ये समावेश करा. त्यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होईल. तसंच भूक कमी लागून वजन कमी होण्यासही मदत होईल.

प्रोटिनयुक्त आहार घ्या

रात्रीच्या जेवणात डाळी आणि अशा भाज्यांचा समावेश करा ज्यातून प्रोटिन मोठ्या प्रमाणात मिळेल. अधिक प्रमाणात प्रोटिन आणि कमी प्रमाणात कर्बोदकांचं सेवन केल्यानं शरीरात साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते.

कमी खा

आयुर्वेदानुसार रात्रीचं जेवण कमी प्रमाणात खावं त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. रात्री झोपण्यापूर्वी अतिप्रमाणात खाल्ल्यानं शरीराला ते पचवण्यात अडचणी येतात.

रात्रीच्या जेवणावेळी या गोष्टी टाळा

दह्याचं सेवन करून नका

आयुर्वेदानुसार रात्री दह्याचं सेवन चांगलं नाही. रात्री दह्याचं सेवन केल्यानं शरीरातील कफ दोष वाढतं असल्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलंय.

गोड पदार्थ टाळा

केक, कुकीज किंवा इतर गोड पदार्थ ज्यामुळे रक्तातील शर्करेची पातळी वाढते आणि परिणामी ऊर्जा पातळीतही वाढ होते. त्यामुळे झोपेत व्यत्यय येतो. त्यामुळे साखरेचा समावेश असलेले असे गोड पदार्थ खाणं टाळा. त्याऐवजी मधाचं सेवन करा.

सलाड खाणं टाळा

रात्री कच्चं सलाड खाणं चांगलं नाही. आयुर्वेदानुसार त्यामुळे शरीरात वायुदोषाची निर्मिती होते.

रात्री मिठाचं सेवन टाळा

रात्रीच्या जेवणात सॉल्टी पदार्थ खाणं टाळल्यानं स्ट्रोक, हृदयाचे आजार, रक्तदाब इत्यादी आजारांचा धोका कमी होतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter