आयुर्वेदही ठेवेल तुमचे डोळे निरोगी

आयुर्वेदातील आठ अंगांपैकी डोळ्यांसाठी असलेले अंग (Branch) म्हणजेच शालाक्यतंत्र यामध्ये डोळ्यांचे सविस्तर वर्णन आलं आहे. याबाबत आयुर्वेदीय नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. निखिल माळी यांनी अधिक मार्गदर्शन केलं आहे

0
2263
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आयुर्वेदीय औषधांनी डोळ्यांचे आजार बरे होतात का? आयुर्वेदामध्ये डोळ्यांच्या आजारावर औषधं आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार रुग्णांकडून केला जातो. या सर्व प्रश्नांची उत्तरं खूपच सोपी आहेत. सर्व प्रकारचे उपचार करून थकल्यावर रुग्ण आयुर्वेदाकडे वळतात. सर्व शरीर तसंच मनावर उपचार करणाऱ्या चिकित्सापद्धतीमध्ये डोळ्यांचे आजार का बरे ठीक होऊ नयेत?

आयुर्वेदाच्या प्रयोजनानुसार डोळ्यांचे स्वास्थ्य किंवा आरोग्य अबाधित राखण्यापासून वर्णन करण्यात आलं आहे. यामध्ये अंजने, नस्य ,शिरोभ्यंग, पादाभ्यंग आणि इतर व्यायाम यांचा समावेश होतो. हल्ली लहान वयातच मुलांना डोळ्यांचे विकार उद्भवतात, हे रोग होऊच नयेत म्हणून घ्यावयाच्या संकल्पनांचे वर्णन आयुर्वेदामध्ये आहे. या सर्व गोष्टींचं पालन करून जर विकार उद्भवले तर त्याचं उत्तरसुद्धा आयुर्वेदाकडे आहे.

आयुर्वेदातील आठ अंगांपैकी डोळ्यांसाठी असलेले अंग (Branch) म्हणजेच शालाक्यतंत्र यामध्ये डोळ्यांचे सविस्तर वर्णन आलं आहे.

  • आयुर्वेदामध्ये सर्व ग्रंथांमध्ये मिळून १०० पेक्षा जास्त व्याधींचं वर्णन आहे. यामध्ये त्यांचे उपप्रकार, अवस्था, उपचार यांचंही वर्णन आहे. औषधोपचाराचे विविध मार्ग (Routes of Administration),  विविध पद्धती (therapuetics) याबद्दल माहिती आहे. तसंच काही व्याधीमध्ये शस्त्रक्रियेचंदेखील वर्णन आहे.
  • डोळ्यांची पाच महाभूतांपासून होणारी उत्पत्ती, डोळ्यांची रचना (Anatomy), क्रिया(Physiology) यांची माहिती आयुर्वेदामध्ये आहे.
  • डोळ्यांचे आरोग्य अबाधित ठेवणे, निरोगी ठेवणे(Preventive Ophthalmology) यांचा सर्वंकष विचार आयुर्वेदातील दिनचर्येमध्ये आला आहे.
  • इतकंच नव्हे तर डोळ्यांसाठी कोणता आहार(Dietics) योग्य आहे किंवा हानिकारक आहे याचा सखोल विचार केला गेला आहे.
  • डोळ्यांना होणाऱ्या आजारांची कारणे म्हणजेच हेतू (Aetiology), आजार होण्याची क्रिया-संप्राप्ती (Pathogenesis), लक्षणे (Symptoms),पूर्व लक्षणे (Prodromal symptoms) अशा प्रकारे जवळपास १०० व्याधींचे वर्णन आहे.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे या आजारांची चिकित्सा यांचे सविस्तर वर्णन आहे. यामध्ये डोळ्यांसाठी विशिष्ट अशा क्रियाकल्पांचे तसंच शस्त्रकर्मांचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

अशा प्रकारे आपल्या शास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये डोळ्याचे महत्त्व वर्णन करून त्याला श्रेष्ठत्व दिलं गेलं आहे. त्यामुळे अशा संपन्न चिकित्सापद्धतीचा डोळ्यांसाठी वापर करून घेण्यास आपण नक्कीच उत्सुक असाल जेणेकरून डोळ्यांचे आरोग्य अबाधित राहिल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter