महापरिनिर्वाण दिन-डॉक्टरांनी राबवली ‘मासिक पाळी’ स्वच्छता जनजागृती मोहीम

ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड्सबाबत अजूनही जागरुकता नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्यासंख्येने गावखेड्यातून महिला मुंबईत येतात. या महिलांना मुंबईतील डॉक्टरांकडून सॅनिटरी पॅड्सचं विनामुल्य वाटप करण्यात आलं. मासिक पाळीच्या दिवसात कशी स्वच्छता राखावी, याचीही माहिती त्यांना देण्यात आली.

0
101
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मासिक पाळी या विषयावर महिला बोलत नाहीत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये अजूनही मासिक पाळी आणि त्या दिवसातील स्वच्छतेबाबत जागरुकता नाही. खेड्यापाड्यातील महिला अजूनही पाळीच्या दिवसात जुन्या साड्या, टॉवेल, नॅपकिन्स वापरतात. यासाठीच मुंबईतील डॉक्टरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आलेल्या महिलांना मोफत सॅनिटरी पॅड्सचं वाटप केलं.

Insert (39)

यामुळेच महिलांमध्ये ‘मासिक पाळी आणि स्वच्छता, यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याचा विचार जे.जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे आणि डॉ. आकाश वाघमारेंनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला आणि मुलींना मासिक पाळी आणि स्वच्छतेसंदर्भात डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं.

 

Insert-2 (5)

याबाबत सांगतात जे.जे.रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे म्हणाले की, “भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त १५ टक्के महिला मासिक पाळीच्या कालावधीत सॅनिटरी पॅडचं वापर करतात. या दिवसात महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. पण यासंदर्भात महिलांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने देशात सर्व्हाकल कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. महाराष्ट्रातील अशी काही गावं आहेत, ज्या ठिकाणी अद्यापही सॅनिटरी पॅड्स अजूनही पोहोचलेले नाहीत.”

डॉ. कानिंदे यांनी म्हटले की, “महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सॅनिटरी पॅड्स ना नफा ना तोटा तत्त्वात उपलब्ध करून द्यावा. याकरता आम्हाला नेमकं काय करता येईल यासाठी प्रयत्न करतोय.”

देशातील सुशिक्षित महिला ‘हॅप्पी टू ब्लीड’ ही चळवळ राबवतायेत. मात्र, तरीही देशात गोरगरीब महिलांचा असा एक मोठा वर्ग आहे, ज्यांच्यामध्ये सॅनिटरी पॅडविषयी जागरूकताच नाही. त्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांना मोफत सॅनिटरी पॅडच वाटप करण्यात आलं, असं डॉ. आकाश गायकवाड यांनी सांगितलं.

डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन, जे.जे. रूग्णालयात शिक्षण घेणारे आम्रपाली घाडे, वैशाली भालेराव व आदित्य तांबे यांनी मिळून ४ ते ६ डिसेंबर दादर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात ४०० ते ५०० महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप केलं.

भारतात एकूण महिला लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १५ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. उर्वरित महिला कपड्याचा वापर करतात. वारंवार एकच कपडा वापरल्यामुळे योगीमार्गाचा कॅन्सर (सर्व्हाकल कॅन्सर) होण्याचा धोका अधिक असतो. सध्या महिलांमध्ये सर्व्हाकल कॅन्सरचे प्रमाण २६ टक्के आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)