चेहरा धुताना ‘या’ चुका करू नका

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

उन्हाळ्यात घाम आणि उन्हानं चेहरा तेलकट होत असल्यानं चेहरा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. बाहेरून घरी आल्यानंतर चेहऱ्यावरील धूळ आणि तेल दूर करण्यासाठी चेहरा धुवायलाच हवा. मात्र चेहरा धुताना काय काळजी घेणं गरजेचं आहे ते जाणून घ्या

चेहरा जास्त धुवू नका

अनेकांना दिवसातून अनेकदा चेहरा धुण्याची सवय असते. मात्र वारंवार चेहरा धुणं चांगलं नाही. चेहरा सकाळी आणि संध्याकाळी असा 2 वेळा धुवायला हवा. जर तुम्ही बाहेर कामासाठी जात असाल तर कामाच्या आधी आणि कामाच्या नंतर असा दिवसातून 4 वेळा चेहरा धुणं ठिक आहे. मात्र त्यापेक्षा जास्त वेळा चेहरा धुवू नका.

अयोग्य क्लिनझर वापरणं

तुमच्या त्वचेला सूट होईल असं क्लिनझर वापरा. जर तुमची त्वचा नॉर्मल टू ड्राय असेल तर हायड्रेटिंग आणि क्रिमी क्लिनझर वापरा. जर त्वचा संवेदनशील असेल तर जेंटल क्लिनझर वापरा, साबण टाळा आणि त्वचा ऑईली असेल तर सॅलिसिलिक असिडयुक्त फेसिअल वॉश वापरा. कॉम्बिनेशन स्किन असेल तर फोमिंग किंवा जेल क्लिनझर वापरा.

क्लिनझर वापरण्याची पद्धत

क्लिनझर वापरण्याचीदेखील एक पद्धत असते. तुम्ही क्लिनझिंग लोशन वापरत असाल तर मॉईश्चरायझरप्रमाणे ड्राय स्किनवर काही मिनिटं चोळा. जेल किंवा फोम्स वापरत असाल तर सुरुवातीला चेहरा ओला करा आणि मग वापरा. अक्नेसाठी क्लिनझर वापरत असाल तर काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या त्यानंतर धुवा.

गरम पाणी वापरणं

चेहरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नका. गरम पाण्यामुळे चेहऱ्यावर रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. चेहरा लासर आणि कोरडा होतो. त्यामुळे कोमट पाण्यानं चेहरा धुवा.

चेहरा धुतल्यानंतर

चेहरा धुतल्यानंतर घासू नका. यामुळे इरिटेशन आणि रेडनसची समस्या निर्माण होईल. एखाद्या कपड्यानं फक्त चेहऱ्यावर टॅप करा जेणेकरून फक्त चेहऱ्यावरील पाणी शोषलं जाईल.

सारखाच टॉवेल वापरणे

चेहरा पुसण्यासाठी वापरत असलेला टॉवेल स्वच्छ असायला हवा. वापरलेल्या टॉवेलवर बॅक्टेरिया असू शकतात. तसंच चेहरा पुसण्यासाठी बेबी टॉवेल वापरल्यास फायदेशीर कारण त्यामुळे त्वचेला हानी पोहोचत नाही.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter