दिल्ली- अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत खूप सुधारणा झालीये. अटल बिहारी वाजपेयींवर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ११ जूनला अटल बिहारी वाजपेयींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा 
  • अटल बिहारी वाजपेयींना किडनी आणि फुफ्फुसात इन्फेक्शनचा त्रास 
  • किडनीचं कार्य सुधारल्याची एम्सच्या डॉक्टरांची माहिती 

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहेत. मूत्राशयाचं इन्फेक्शन आणि फुफ्फुसाचा त्रास झाल्याने त्यांना ११ जून रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. डॉक्टरांनी अटल बिहारी वाजपेयींना अॅन्टीबायोटिक्स सुरू केलेत.

बुधवारी डॉक्टरांनी अटल बिहारी वाजपेयींचं मेडिकल बुलेटिन जाहीर केलं.

डॉक्टरांच्या माहितीनुसार,

त्यांना किडनीचा आजार असल्याने डायलेसिसवर ठेवण्यात आलं होतं. उपचारांना त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालीये. त्यांच्या किडनीचं कार्य सुधारलंय. आणि लघवीचं प्रमाणही चांगलं आहे. त्यांचं ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास सामान्य आहे. येत्या काही दिवसात ते बरे होतील अशी आशा आहे.

गेल्या काही वर्षांपासून अटल बिहारी वाजपेयींची तब्येत चांगली नाहीये. एम्सच्या डॉक्टरांची टीम चोवीस तास त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे.

DfkMRdfUwAAq5HA

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter