धक्कादायक! महाराष्ट्रात गर्भवती महिलांमध्ये वाढतोय ‘अॅनिमिया’

जगभरात जवळपास ६१ कोटी महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत. ज्यातील सर्वात जास्त म्हणजे १५ ते ४९ या वयोगटातील १४.६ कोटी महिला फक्त एकट्या भारतात आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी महाराष्ट्रात अॅनिमिया ग्रस्त गरोदर मातांची संख्या वाढत असल्याची कबुली दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • महाराष्ट्रात एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधित तब्बल 75,235 गर्भवती महिला अॅनिमियाने ग्रस्त
  • पुण्यात वर्षभरात 5,865 गंभीर अॅनिमिया (रक्तक्षय) असलेल्या गरोदर माता आढळल्या 
  • तर मुंबई गंभीर अॅनिमिया (रक्तक्षय) असलेल्या गरोदर मातांची संख्या 5,267  
  • आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत माहिती 

अॅनिमिया, म्हणजे शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होणं. शरीरात ‘लोह’ खनिजाचं प्रमाण कमी झालं की अॅनिमिया हा आजार होतो. टीबी, कॅन्सर, मलेरिया यांसारखे आजार, त्याचसोबत पौष्टीक आहाराची कमतरता यामुळे अॅनिमिया होण्याची शक्यता असते.

विधानपरिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी अॅनिमियाने ग्रस्त महिलांची संख्या वाढत असल्याची कबुली दिलीये. विधीमंडळात उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले, “राज्यात रक्तक्षय म्हणजेच अॅनिमिया रुग्णांमध्ये वाढ झालीये. राज्यात एप्रिल 2017 ते मार्च 2018 या वर्षात 75 हजारपेक्षा जास्त अॅनिमिया ग्रस्त महिला आढळून आल्यात.”

डॉ. सावंत पुढे म्हणाले, National Iron Plus Initiative या कार्यक्रमाअंतर्गत

  •  ६ ते ५९ महिन्यातील बालकांना आठवड्यातून दोनदा
  • ५ ते १० वर्षातील बालकांना आठवड्यातून एकदा
  • १० ते १९ वर्षातील किशोरवयीन मुलींना आठवड्यातून एकदा
  • गरोदर माताींना गरोदरपणात १८० गोळया (दररोज एक)
  • स्नतदा माताींना प्रसूतीनंतर १८० गोळया (दररोज एक)
  • १५ ते ४९ वयोगटातील गरोदर व स्तनदा नसलेल्या महिलांना आठवड्यातून एकदा लोहयुक्त औषधं किवा गोळ्या देण्यात येतात.

याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना सायन रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निरंजन चव्हाण म्हणाले, “महिलांना न मिळणारा पौष्टीक आहार, आणि शरीरातील कमी होणारं लोहाचं प्रमाण यामुळे अॅनिमिया होतो. सायन रुग्णालयात येणाऱ्या १०० रुग्णांपैकी २०-२५ महिला अॅनिमियाग्रस्त असतात. आमच्या रुग्णालयात दरवर्षी १२ ते १४ हजार प्रसूती होतात.”

जगभरात जवळपास ६१ कोटी महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत. ज्यातील सर्वात जास्त म्हणजे १५ ते ४९ या वयोगटातील १४.६ कोटी महिला फक्त एकट्या भारतात आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter