एलफिस्टन चेंगराचेंगरी: अग्निपरिक्षा संपली, आता विद्यपीठाची परिक्षा आकाश घरून देणार

पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन दुर्घटनेत डोळ्यासमोर झालेला भावाचा दुर्देवी मृत्यू, तोंडावर आलेली परिक्षा, सुरू असलेले उपचार अशा परिस्थितीत बीकॉमच्या द्वितीय वर्षातील सत्र परिक्षा कशी द्यायची हा प्रश्न जखमी आकाश परबला पडला होता. परंतु, मुंबई विद्यापीठ या आकाशच्या मदतीला धावून आले आहे. कारण मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी व विक्रोळी महाविद्यालयातील प्रतिनिधी यांनी स्वतः आकाशच्या घरी जाऊन त्याची परीक्षा घेतली. विद्यापीठाच्या नियमानुसार त्याला वाढीव एक तास सुद्धा देण्यात आला होता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

एलफिन्स्टन दुर्घटनेत जखमी झालेले अनेकजण अजूनही त्या गंभीर धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतायेत. त्यापैकीच एक भांडूपच्या रामानंद आर्य़ डीएव्ही महाविद्यालयात बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी आकाश परब.

लहान भावाच्या दुर्देवी मृत्यूच दुःख, स्वतःला होणाऱ्या वेदना, तोंडावर आलेली तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा अशा तिहेरी संकटांचा सामना तो अनेक दिवसांपासून करत होता. अचानक झालेल्या अपघातात भावाला गमावल्याने आधीच दुःखाचं डोंगर कोसळलेले असताना, परीक्षा तर द्यायचीय, पण ते कसं या विचारात तो मनातल्या मनात कुंचत होता.

IMG-20171110-WA0058

पण आकाशच्या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पुढाकार घेत आकाशच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहे. आकाशने परीक्षा द्यावी, याकरता त्यांनी परीक्षा विभागाला तात्काळ पाऊले उचलण्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक ड़ॉ. अर्जुन घाटुळे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन आकाश परबची चौकशी केली. रुग्णालयातून आकाशच्या घरचा पत्ता घेऊन त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याला राहत्या घरीच परीक्षा देता येईल, असे आश्वासन दिलंय. त्यानुसार शुक्रवारी  विद्यापीठाने आपले प्रतिनिधी आणि महाविद्यालयातील शिक्षक यांनी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका घेऊन आकाशच्या घरी परीक्षा घेण्यासाठी पाठवले. परीक्षा लिहताना येणाऱ्या संभाव्य अडचणींचा विचार करून विद्यापीठाने नियमाच्या अनुषंगाने त्याला एक तास वाढवूनही दिला. इतकंच नाहीतर नुकत्याच सुरू झालेल्या बीकॉम द्वितीय वर्ष(सत्र तीन)चे आकाशचे उर्वरित पेपरही त्याला त्याच्या राहत्या घरीच देता येणार याची विद्यापीठाने विशेष काळजी घेतली आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव लिलाधर बनसोड म्हणाले की, “कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पुढाकार घेतलाय. शिवाय आकाश परबला स्वतःहून परीक्षा द्यायची इच्छा होती. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थांची परीक्षा द्यायची इच्छा असल्यास आम्ही त्याला अडवू शकत नाही. म्हणूनच केईएम रुग्णालयात जाऊन आकाशच्या प्रकृतीची चौकशी करून त्याला राहत्या घरीच परीक्षा देता येईल, असा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यानुसार विद्यापीठाचे प्रतिनिधी व महाविद्यालयातील शिक्षकांनी प्रश्नपत्रिका आकाशच्या घरी घेऊन गेले. आणि आकाशने परीक्षा दिली.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter