‘वायू प्रदूषणामुळे वाढतो हृदयविकाराचा धोका’

धूर आणि धुक्यामुळे देशाची आर्थिक राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणाची राजधानी बनली आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार, खोकला, डोळ्यांची जळजळ व मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम असे दुष्परिणाम होऊ शकतात. याचसोबत वाढत्या वायू प्रदूषणामुळे हृदयासंदर्भातील विकारही होण्याची दाट शक्यता असल्याचे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. कौशल छत्रपती यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पावसाळा ऋतू संपून हिवाळा सुरू झाल्यावर दिल्लीलगतच्या परिसरात शेतकरी शेतातील कचरा जाळतात. या कचरा जाळण्यामुळे निर्माण होणारा धूर दिल्लीला दरवर्षी वेढा घालतो. वाऱ्यांची दिशा उत्तरेकडे असल्याने हा धूर दिल्लीत पसरतो. या धुरामुळे दिल्लीत प्रदूषणाची खूप मोठी समस्या निर्माण होते. हिवाळ्याच्या ऋतूत दिल्लीचे तापमान खूपच खाली येत असल्याने दाट धुके पसरते. इतकंच नव्हेतर वाहनांमधून बाहेर पडणारा धूर ही हवेत मिसळतो. त्यामुळे दिल्लीला वायू प्रदूषणाचा मोठा फटका बसतोय.

दिल्लीत हवेतील धुलीकणांची पातळी पीएम २.५ (२.५ मायक्रॉनपर्यंत लहान आकाराचे धुलीकण) इतकी असून ही अतिशय घातक मानली जाते. या धुलीकणामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कारण, वायू प्रदूषण थेट हृदय व मेंदूच्या आजाराशी संबंधित आहे. प्रदूषणामुळे फुफ्फुसावरही परिणाम होतो. विशेषतः प्रदूषणामुळे वायूंच्या बरोबरच धूर, धुळीचे कण व माती व्यक्तींच्या फुफ्फुसांमधून रक्तामध्ये जातात आणि आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते.

डॉ. कौशल छत्रपती
डॉ. कौशल छत्रपती

जर आपणं भारतातील प्रदूषणातील धुलीकणाच्या पातळीकडे पाहिले तर मुंबई, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसून येत आहे. हे मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय घातक आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारांसह, दमा व फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. मात्र, वायू प्रदूषणामुळे अलीकडील एका संशोधनात हृदयविकाराची समस्याही उद्भवू शकते असं म्हटलं आहे.

इतकंच नाहीतर बहुतांश जणांनी धुम्रपान करण्याची सवय असते. हवेत हा वायू मिसळूनही अनेकांना फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. मुळात धुम्रपान करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांना जास्त धोका असतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)