आयुर्वेद- ‘अग्निकर्म’ एका चटक्यात बरी करा सांधेदुखी

व्यायामाचा अभाव, कामाचा ताण, बदललेली जीवनशैली यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढल्यात. खराब रस्ते, खाचखळग्यातून प्रवास यामुळे शरीराला सतत हादरे बसतात. अशा वेळी पेनकिलर घेऊन काम चालू राहतं. पण काही वेळा उपचाराला वेदना दाद देत नाहीत. अशा रुग्णांच्या वेदना कमी कऱण्यासाठी वरळी येथील पोद्दार आयुर्वेदीक रुग्णालयात स्वतंत्र वेदनारहित बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आलाय

0
3651
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अगं खूप मान दुखतेय..अरे यार…आज जाम पाठ दुखतेय रे…अरे हाता-पायात खूप पेन होतयं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत..बदललेल्या जीवनशैलीमुळे सांधेदुखी वाढलीये. हात-पाय आणि कंबर दुखीचं कारण तर हल्ली सर्रास प्रत्येकाच्या तोंडातून ऐकू येतं.

भारतातील २० ते ३० वयोगटांतील पाच पैकी एक व्यक्ती मणक्याच्या आजाराने त्रस्त आहे. मणक्यावरील ताणामुळे निर्माण होणारी कंबरदुखी, पाठदुखी, खांदेदुखी याचबरोबर सौम्य व तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, मानदुखी या समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्यात. तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पाठीचं दुखणं हा सर्वसामान्यपणे आढळून येणारा आजार आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये या समस्या मोठ्याप्रमाणात दिसू लागल्या आहेत.

आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, सांधेदुखीवर आयुर्वेदात उत्तम औषध आहे. अग्निकर्म त्यापैकीच एक. अग्निकर्म म्हणजे खूप वेदना असणाऱ्या ठिकाणी दिला जाणारा चटका. शरीराच्या एखाद्या भागात विशेषतः पायाला किंवा कमरेला आगीचा चटका दिला जातो. जेणेकरून त्याजागीचे दुखणं कायमच घालवता येईल.

Insert (13)

‘‘अग्निकर्मामुळे शरीराला होणाऱ्या विविध वेदना बऱ्या करता येऊ शकतात. पाठदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी यावर अग्निकर्माच्या सहाय्याने उपचार केल्यास आजार पूर्ण बरा होतो. अशा समस्या घेऊन अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. पण, कमी वेळात आणि कमी खर्चात वेदना थांबविणारी ही उपचारपद्दती उक्त भीतीपोटी मागे पडली. त्यामुळे मुंबईच्या पोद्दार आयुर्वेदीक रुग्णालयात अग्निकर्मचा स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू केला’’, अशी माहिती पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गोविंद खटी यांनी दिली.

पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रज्ञा कापसे यांनी सांगितलं की, ‘‘सांधेदुखीचा आजार बरा करण्यासाठी आयुर्वेदात विद्धाअग्निकर्म ही उपचारपद्धत आहे. या उपचारपद्धतीत शरीरात ज्या ठिकाणी वेदना होत आहेत. त्याठिकाणी विशिष्ट धातूच्या सळीने (पेनासारखी दिसणारी) हलकासा चटका दिला जातो. या उपचारामुळे रुग्णाला 20 ते 25 टक्के वेदनेतून आराम मिळतो. पण, त्यानंतर आणखीन तीन-चार दिवस असं करावं लागतं. त्यानंतर औषधचिकित्सा सुरू केल्यानंतर रुग्ण ठणठणीत बरा होतो.’’

‘‘5 जूनला रुग्णालयात एका शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीरात 110 रुग्णांवर उपचार कऱण्यात आले आहेत. सध्या बाह्यरुग्ण विभागात दररोज 30 ते 40 रुग्ण येतायेत. सूज नाही पण, वेदना होतेय अशा रुग्णांवरच अग्निकर्म पद्धतीने उपचार केला जातायत’’ असंही डॉ. कापसे यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter