तुम्ही दुपारी झोपता? मग तुम्हाला या व्याधींचा धोका आहे

दुपारची झोप सगळ्यांनाच प्रिय आहे. मात्र ही सवय शरीराला घातक ठरु शकते. दुपारी झोपण्यामुळे तुम्हाला अनेक व्याधी जडू शकतात.

0
2737
तुम्ही दुपारी झोपता? मग तुम्हाला या व्याधींचा धोका आहे
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

निरोगी आरोग्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. दुपारी जेवण झाल्यावर ताणून देणं तर प्रत्येकालाच आवडतं. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात. दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाचे दोष निर्माण होतात. याचसोबत शरीरात मेदाचाही संचय होतो. त्यामुळे या व्याधींपासून लांब राहायचं असेल तर दुपारची झोप टाळलेलीच बरी..

अतिप्रमाणात वजन वाढणे

सोर्स- न्यूज मॅक्स
सोर्स- न्यूज मॅक्स

दुपारच्या झोपेमुळे शरिरात फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो. यामुळे अतिप्रमाणात वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.

जखम न भरणं

तुम्ही दुपारी झोपता? मग तुम्हाला या व्याधींचा धोका आहे
सोर्स- वेब एम.डी

दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.

त्वचेचे विकार

तुम्ही दुपारी झोपता? मग तुम्हाला या व्याधींचा धोका आहे
सोर्स- हेल्थलाईन

कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.

मधुमेह वाढतो

तुम्ही दुपारी झोपता? मग तुम्हाला या व्याधींचा धोका आहे
सोर्स- इंडिया.कॉम

दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter