नवीन वर्षी चालायला लागणार मुंबईचा ‘चॅम्पियन’

मुंबईच्या ‘चॅम्पियन’चे एका अज्ञात व्यक्तीने पंजे कापून टाकले होते. ‘अनिमल मॅटर टू मी’ ही संस्था सध्या ‘चॅम्पियन’वर औषधोपचारासाठी मदत करतेय. लवकरच ‘चॅम्पियन’ला कृत्रिम पंजे लावण्यात येणार आहेत. जानेवारी २०१८ पर्यंत ‘चॅम्पियन’ पुन्हा त्याच्या पायावर उभा राहील अशी आशा डॉक्टर आणि सामाजिक संस्थेचे अधिकारी व्यक्त करतायत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दोन महिन्यांनंतर अखेर मुंबईचा ‘चॅम्पियन’ आपल्या पायावर उभा राहू शकणार आहे, चालू-फिरू शकणार आहे. डिसेंबर महिन्यात ‘चॅम्पियन’ला कृत्रिम पंजे लावण्यात येणार असून, नवीन वर्षात ‘चॅम्पियन’ चालू लागेल अशी अशा डॉक्टरांनी व्यक्त केलीये.

माय मेडिकल मंत्राने पहिल्याना २० नोव्हेंबरला ‘चॅम्पियन’वर झालेला अत्याचार उघडकीस आणला होता. त्यानंतर बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम, रेडियो जॉकी मलिश्का, अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी चॅम्पियनला मदतीसाठी पुढाकार घेतला होता.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना अॅनिमल मॅटर टू मी या संस्थेचे गणेश नायक म्हणाले, “दोन दिवसापूर्वी कृत्रिम अवयव बनवणारे तज्ज्ञ चॅम्पियनची परिस्थिती पाहून गेले. येणाऱ्या काळात चॅम्पियनला कृत्रिम अवयव बसवले जातील.”

IMG-20171206-WA0075

हा कुत्रा एका व्यक्तीला मीरा-भाईंदर परिसरात रस्त्यावर पडलेला आढळला. या कुत्र्याचं लिंग आणि पंजे कापून टाकण्यात आले होते. अॅनिलम मॅटर टू मी या संस्थेने या कुत्र्याला चॅम्पियन असं नाव दिलं. सध्या चॅम्पियनवर उपचार सुरू आहेत.

चॅम्पियनच्या परिस्थितीबाबत गणेश नायक म्हणतात, आता ८५ टक्के जखम भरून आलीये. त्यामुळे येत्या काही दिवसात चॅम्पियनवर कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येईल. आमची अशा आहे की चॅम्पियन जानेवारी २०१८पर्यंत आपल्या पायावर चालू शकेल.

चॅम्पियनवर शस्त्रक्रियेसाठी १.७५ लाख रूपये खर्च येणार आहे. लोकांच्या मदतीतून आतापर्यंत ७५ हजार रूपये जमा झालेत. पुढील रक्कम उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

प्राण्यांसाठी कृत्रिम अवयव तयाप करणारे दैविक महामूनी सध्या चॅम्पियनसाठी कृत्रिम पंजे तयार करतायत. माय मेडिकल मंत्राशी बोलताना ते म्हणाले, “चॅम्पियनवर पहिल्यांदा एक शस्त्रक्रिया होईल. त्याचे उललेले पंजे कापून टाकण्यात येतील. त्यानंतर कृत्रिम पंजे बसवले जातील.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter