नव्या वर्षासह शेख यांनी मिळालं नवं आयुष्य

शेख यांना टीबी आर्थरायटीस या आजाराचं निदान कऱण्यात आलं होतं. या आजारात सांध्यावर (हिप आणि गुडघे) अतिरिक्त वजन येतं. यामुळे शेख गेले आठ महिने अंथरूणाला खिळून होते. मात्र नानावटी रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता उत्तम आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

८ महिन्यांनंतर अखेर मुंबईतील वाय.एम शेख आता चालू फिरू शकतात. त्यांच्यावर गेल्याचं आठवड्यात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आलीये. त्यांना टीबी आर्थरायटीस या आजाराचं निदान कऱण्यात आलं होतं. या आजारात सांध्यावर (हिप आणि गुडघे) अतिरिक्त वजन येतं. यामुळे शेख गेले आठ महिने अंथरूणाला खिळून होते.

वाय.एम शेख याचा १९९८ साली अपघात झाला होता आणि या अपघातादरम्यान त्यांच्या हिपच्या हाडांची रचना बदलली गेली. त्यांचं वजन १०० किलो इतकं वाढलं आणि त्य़ानंतर त्यांना अनेक समस्या उद्भवत गेल्या.

शेख यांनी त्यांच्या आजारपणासाठी मुंबईतील अनेक रूग्णालयं पालथी घातली मात्र त्यांना कोणताही फरक जाणवून आला नाही. अखेर त्यांनी नानावटी रूग्णालयात उपचार करण्याचं ठरवलं. त्यांना टीबी आर्थरायटीस आजार होता आणि शक्यतो या आजारात हिप रिप्लेसमेंट करता येत नाही.

मात्र नानावटी रूग्णालयात शेख यांच्यावर आधुनिक पद्धतीने हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली. या सर्जरीसाठी खास हिप सॉकेट अमेरिकेहून मागवण्यात आलं.

शेख यांच्यावर याआधी देखील एका रूग्णालयात हिप रिपल्समेंट सर्जरी करण्यात आली होती. मात्र ती अपयशी ठरली. आणि त्यानंतर शेख अंथरूणाला खिळले होते.

याविषयी नानावटी रूग्णालयाचे आर्थरायटीस आणि जॉईंट्स रिप्लेसमेंट सर्जरी विभागाचे संचालक डॉ. प्रदीप भोसले यांच्या सांगण्यानुसार, “ही शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रूग्णाच्या संधिवाताच्या वेदना कमी होतात शिवाय रूग्ण पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने चालू फिरू शकतो.”

सध्या शेख यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलंय. पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहायला मिळ्याल्याने शेख फार खूष आहे. ते सांगतात की, “मी पुन्हा उभं राहायला लागल्याने माझे घरचे आणि मित्रमंडळी आनंदी आहेत. मला उपचार दिल्याबद्दल मी डॉक्टरांचा खूप आभारी आहे. शिवाय रूग्णालयाने माझ्याकडून या महागड्या शस्त्रक्रियेचे पैसेही घेतले नाहीत. त्यामुळे मला एक नवीन आयुष्य़ मिळालयं.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)