‘या’ वेळेला पाणी प्याल तर निरोगी राहाल

पाण्याच्या प्रमाणासोबतच पाणी पिण्याची वेळही महत्त्वाची आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

निरोगी राहण्यासाठी दिवसाला कमीत कमी २ लीटर पाणी प्यावं असं सांगितलं जातं. मात्र पाणी नेमकं कधी प्यावं असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. पाण्याच्या प्रमाणासोबतच पाणी पिण्याची वेळही तितकीच महत्त्वाची आहे. दिवसभरात नेमकं पाणी कधी प्यायला हवं जाणून घेऊयात.

सकाळी उठल्यानंतर

सकाळची सुरुवात एक ग्लास पाण्याने करा. यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जाता आणि दिवसभरासाठी ऊर्जाही मिळते. मात्र हे पाणी साधं किंवा कोमट असावं, गार पाणी पिऊ नये.

जेवणापूर्वी

जेवण्यापूर्वी पाणी प्यायल्यानं तुमचं पोट पुरेसं भरतं, ज्यामुळे तुम्ही जेवताना जास्त खात नाही. जेवणाच्या ३० मिनिटं आधी पाणी प्यायल्याने तुमच्या जिभेला चवही येते आणि पोटातील आतड्यांसाठीही चांगलं असतं. जेवणाच्या आधी तुम्ही दुसरे पदार्थ खाल्ले असाल किंवा काही प्यायला असाल तर पाणी प्यायल्याने जिभेवरील त्या पदार्थांची किंवा पेयाची चव निघून जाते.

भूक लागल्यावर

दुपारच्या जेवणानंतर अनेकदा आपल्याला भूक लागल्यासारखी वाटते. मात्र ही भूक नसून तहान असते. भूक आणि तहानेतला फरक आपल्या लक्षात बहुधा येत नाही. त्यामुळे अशावेळी एक ग्लासभर पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. नंतर तुमच्या लक्षात येईल ती भूक नव्हती तर तुमचं शरीर डिहायड्रेट झालं होतं. म्हणजेच शरीरात पाण्याची गरज होती.

व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर

व्यायामामुळे घाम येतो आणि शरीर डिहायड्रेट होतं. हे डिहायड्रेशन टाळण्यासाठी व्यायामापूर्वी आणि नंतर २ ते ३ ग्लास पाणी प्यावं. यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळीही नियंत्रणात राहते.

आजारी असताना

जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. यामुळे तुमचं शरीर फक्त हायड्रेट राहत नाही तर तुमच्य शरीरातील विषारी घटकही बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तुम्ही आजारातून लवकर बरे होता.

थकलेले असताना

तुम्ही खूप थकलेले आहात मात्र आरामासाठी पुरेसा वेळ नाही मग एक ग्लासभर पाणी प्या. थकवा हे डिहायड्रेशनचं एक लक्षण आहे. पाणी प्यायल्यानं तुमच्या शरीरात ऊर्जा येते, मेंदू कार्य करायला लागतो आणि तुम्हाला काम करताना झोप लागत नाही.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter