या ६ लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका

कोणत्याही आजाराचं अचून निदान होण्यासाठी त्याची लक्षणं समजून घेणं गरजेचं असतं. मात्र अनेकवेळा आपण लक्षणांकडे दुर्लक्ष करून पुढे चालतो. अनेकवेळा वेदना या गंभीर आजारांची लक्षणं असू शकतात. त्यामुळे लक्षणं वेळीच लक्षात घ्यायला पाहिजेत. खाली दिलेली लक्षणं आढळण्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

हात आणि पायात अशक्तपणा जाणवणे

हात-पायात अशक्तपणा जाणवत असेल किंवा बधिर झाल्यासारखं वाटतं असल्यास हे स्ट्रोक सारख्या गंभीर आजाराचं लक्षणं असू शकतात. अशावेळी तोल जाणं किंवा चालताना त्रास होणं या समस्या दिसून आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अशा प्रकारची लक्षणं आढल्यास वेळीच उपचार करावे. स्ट्रोकवर वेळीच उपचार झाल्यास शरीरावर होणारे गंभीर परिणाम टाळता येतील.

छातीचं दुखणं

धातीत दुखणं हे हृदयाचे आजार किंवा हृदयविकाराचा झटका याचं लक्षणंही असू शकतं. अनेकवेळा धातीत दुखत असल्यास फुफ्फुसांच्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचीही शक्यता असते किंवा याशिवाय इतर गंभीर आजारही उद्भवू शकतात.

कधीही छातीचं दुखणं आढळ्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वॉशिंग्टन डीसी इथल्या वन मेडिकल ग्रुपच्या एमडी शिल्पी अगलवाल यांच्या सांगण्यानुसार, “जर तुम्हाला छातीच्या दुखण्यासोबत घाम येणं, श्वास घेताना त्रास होणं किंवा मळमळ जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.”

पायच्या मागच्या(पोटरी) भागातील वेदना

पायाच्या मागील भागात म्हणजेच पोटरीत वेदना जाणवत असतील तर पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. जास्त वेळ एकाच जागी बसून राहणे, विमानाने दिर्घकाळ प्रवास करणे या कारणांमुळे पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता होऊ शकते.

जर तुमच्या पायात रक्ताच्या गुठळ्या झाल्या असतील तर चालताना किंवा उठून उभं राहताना पायात वेदन होतील. किंवा पायांना सूजही येईल.

लघवीतून रक्तस्राव होणं

लघवीतून रक्त जाण्याची अनेक कारणं असू शकतात. जर तुम्हाला या समस्येसोबत वेदना जाणवत असतील तर किडनी स्टोन असण्याची शक्यता असते.

याविषयी एमडी जेकॉब यांच्या सांगण्यानुसार, “जर एखाद्या व्यक्तीला लघवीतून रक्तस्राव होत असेल यासोबत त्याला सतत लघवीला जाण्याची इच्छा होत असले तर त्या व्यक्तीला मूत्राशय किंवा किडनी यांचं इन्फेक्शन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असा परिस्थितीत जर ताप असेल तर तातडीने डॉक्टरांना भेट द्यावी.”

श्वास घेतेवेळी त्रास

श्वसनाविषयी होणाऱ्या त्रासांवर वेळीच उपचार करावे. जर श्वास घेतेवेळी शिट्टीसारखा आवाज येत असेल तर अस्थमा, फुफ्फुसांचे आजार किंवा अलर्जी झाल्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करावे.

याविषयी एमडी जेकॉब म्हणाले की, “जर श्वास घेतेवेळी शिट्टीसाऱखा आवाज येत असल्यास त्या व्यक्तीला ब्राँकायटीस किंवा न्यूमोनिया देखील असू शकतो.”   

आत्महत्येचे विचार येणं

आपण काही कामाचे नाही, आपला जगून काही फायदा नाही असा प्रकारच्या भावना मनात येत असतील तर मानसोपचारतज्ज्ञांची भेट अवश्य घ्य़ावी. कदाचित अशा व्यक्तींची मानसिक परिस्थिती बिघडलेली असू शकते.

सोर्स-बेव एमडी

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter