नागपूर- तरूणाच्या अवयवदानाने तिघांना जीवनदान

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • नागपूरमध्ये पारं पडलं 43वं अवयवदान
  • 18 वर्षीय तरूणाचं झालं अवयवदान
  • तरूणाच्या अवयवदानामुळे मिळालं तिघांना जीवनदान

नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील लहानशा गावात राहणाऱ्या 18 वर्षीय निखिल सोनावणे याचं अवयवदान कऱण्यात आलंय. या मुलाच्या अवयवदानामुळे तीन व्यक्तींना नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळालीये.

7 डिसेंबर रोजी निखील बाईक घेऊन कामासाठी बाहेर पडला. बाईक चालवत असताना निखिलचा अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर निखिलची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला नागपूरच्या सरकारी मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्याने 9 डिसेंबर रोजी त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं.

ब्रेनडेड झाल्यानंतर सोनावणे कुटुंबियांकडे अवयवदानाची परवानगी मागण्यात आली. निखिलच्या कुटुंबियांंचं अवयवदानाबाबत समुपदेशन केल्यानंतर कुटुंबाने तातडीने अवयवदान करण्यास होकार दिला. त्यानुसार निखिलचे यकृत, 2 किडनी आणि डोळे हे अवयव दान करण्यात आलेत.

नागपूरच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वयक समितीने दिलेल्या माहितीनुसार, एक किडनी नागपूरातील ऑरेंज सिटीला दान करण्यात आलीये. तर दुसरी किडनी नागपूरातील वोक्हार्ट रूग्णालयातील रूग्णाला दान केलीये. रूग्णांचं यकृत नागपूरातील एलेक्सीज रूग्णालयात तर डोळे जीएमसीएच आय बँकेत डोनेट करण्यात आलेत.

नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि ट्रॉमा केअर सेंटरचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले की, “मेडिकलद्वारे अवयवदानासाठी नेहमीच पुढाकार घेतला जातोय. नुकतंच ट्रॉमा सेंटमध्ये 18 वर्षीय मुलाचं अवयवदान करण्यात आलं. याशिवाय ट्रॉमा सेंटरमध्ये स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह सुरु करण्यात आलंय.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter