विलेपार्ले- विहिर दुर्घटनेत 3 जणं मृत्यूमुखी

मुंबईतील विलेपार्लेच्या भागात तीन जण विहिरीत पडल्याची घटना घडलीये. विलेपार्ले पूर्व भागात असणाऱ्या दिक्षीत रोडवरील विहरीत ही दुर्घटना घडलीये. आतापर्यंत 6 महिलांना बाहेर काढण्यात यश आलं असून तीन महिलांचा मृत्य़ु झालाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • विलेपार्ले भागातील विहिरीचा कठडा कोसळून काही जण पाण्यात पडले
  • या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, 8 जण जखमी
  • विलेपार्ले पूर्व भागातील दिक्षीत रोडवरील घटना
  • मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली घटना

मुंबईतील विलेपार्लेच्या भागात काही महिला पुजेदरम्यान विहिरीत पडल्याची घटना घडलीये. विलेपार्ले पूर्व भागात असणाऱ्या दिक्षीत रोडवरील विहरीत या महिला पडल्या. यात 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 8 जण जखमी झालेत. विहिरीतून बाहेर काढलेल्या व्यक्तींना व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विहिरीच्या कठड्यावर काही महिला पुजेसाठी जमल्या होत्या. या दरम्यान कठड्याचा काही भाग कोसळला आणि याठिकाणी जमा असलेल्या काही महिला विहिरीत पडल्या. यामध्ये दोन महिला आणि एका बालकाचा मृत्यू झालाय.

विलेपार्लेतील डीसीपी अनिल कुंभारे यांनी माय मेडिकल मंत्राला दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत काही महिलांना वाचवण्यात यश आलंय. तर तीन महिलांचा मृत्यू झालाय.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडलीये. काही जण या विहिरीच्या कठड्यावर बसले होते. आणि याच दरम्यान ते पाण्यात पडलेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter