आयुर्वेदाच्या संशोधनाबाबत पुण्यात होणार राष्ट्रीय परिषद

पुण्यात आयुर्वेदाच्या संधोधनाबाबत राष्ट्रीय पातळीवर परिषद आयोजित करण्यात येणार आहे. आयुर्वेदा टीचर्स असोसिएशन आणि नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

0
1580
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पुण्यात आयुर्वेदाच्या संधोधनाबाबत राष्ट्रीय पातळीवर परिषद आयोजित करण्यात येणार आहे. आयुर्वेदा टीचर्स असोसिएशन आणि नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. रविवारी 18 ऑगस्ट रोजी सहकारनगरच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलमध्ये ही परिषद होणार आहे.

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या परिषदेचं उद्धाटन करण्यात येणार आहे. याशिवाय आयुर्वेदा टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल सुर्यवंशी मीडियाला संबोधित करतील.

आयुर्वेदा टीचर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन चांदूरकर, सचिव डॉ. मनोज चौधरी, डॉ. अपर्णा सोले, डॉ. भीम गायकवाड आणि डॉ. नितीन वाघमारे यांचाही यामध्ये सहभाग असेल.

या परिषदेच्या उद्धाटन सोहळ्याला वरिष्ठ संशोधक डॉ. विजय भाटकर आणि नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. मोहन खामगावकर उपस्थित असतील. आयुर्वेदाच्या विविध विषयांवर या परिषदेत पॅनल डिसक्शन केलं जाईल.

डॉ. नितीन चांदूरकर यांच्या सांगण्यानुसार, “या परिषदेच्या माध्यमातून आयुर्वेदामध्ये संशोधन करणाऱ्या डॉ. सुधीर कुमार आणि डॉ. एस गोपाकुमार यांचं मार्गदर्शन मिळेल. याशिवाय आयुर्वेदाच्या नैतिक मुद्द्यांवर पुण्याती डॉ. सुप्रिया भालेराव बोलतील तर आयुर्वेदातील औषधांच्या मानकीकरणाबाबत डॉ. श्रीराम ज्योतीशी चर्चा करतील. दिल्लीतील डॉ. तनूजा नेसारी आयुर्वेदातील संशोधन सुविधांसाठी अर्थसहाय्य याविषयावर भाष्य करतील तर आयुर्वेदाच्या संशोधनादरम्यान कोणते अडथळे येतात याची डॉ. घनश्याम मारडा माहिती देतील”

डॉ. मनोज चौधरी म्हणाले, “महाराष्ट्रातील विविध भागातील वरिष्ठ डॉक्टर याशिवाय दिल्ली आणि केरळमधील तज्ज्ञ देखील या परिषदेला उपस्थित असतील. ज्येष्ठ मान्यवरांच्या पॅनेल चर्चेसह आयुर्वेदात मते मांडण्यासाठी ही परिषद एक व्यासपीठ आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter