अवयवदानामुळे जानेवारी महिन्यात १८ जणांना मिळालं नवं आयुष्य

नवीन वर्षांच्या पहिल्या महिन्यात सात ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने १८ रुग्णांना जीवदान मिळू शकले. तर नानावटी रुग्णालयात दोन महिलांनी आणि अपोलो रुग्णालयात एका महिलेनं मृत्यूला कवटाळताना २७ आणि २९ जानेवारी रोजी मेंदू मृत झालेल्या तीन महिलांच्या नातेवाईकांनी रुग्णांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अवघ्या तीन दिवसांत पाच जणांना नवे जीवन मिळालंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अवयवदान सध्या काळाची गरज मानलं जातं. लोकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा यासाठी विविध स्तरावर जनजागृतीही केली जाते. या जनजागृतीमुळे व्यक्ती अवयवदानासंदर्भात पुढाकार घेताना दिसतायत. यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्याचं महिन्यात केवळ मुंबईत सात ब्रेनडेड रूग्णांचं अवयवदान करण्यात आलं. यामुळे जवऴपास १८ लोकांचे प्राण वाचण्यास मदत झालीये.

याविषयी विभागीय प्रत्यारोपण समन्वयक समितीच्या मुंबई समन्वयक उर्मिला महाजन यांनी माय मेडिकल मंत्राशी बोलताना सांगितलं की, “१ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात सात ब्रेनडेड रूग्णांनी अवयवदान केलं असून यामुळे तब्बल १८ लोकांचे प्राण वाचलेत. यामध्ये आठ मूत्रपिंड, सात यकृत आणि तीन हृदय दान केल्याची माहिती आहे.”

२७ आणि २९ जानेवारी या तीन दिवसांत पाच जणांना नवजीवन मिळालंय. यामध्ये नानावटी रूग्णालयात दोन महिलांच्या अवयवदानांमुळे चार जणांना जीवदान मिळालंय. तर अपोलो रुग्णालयात झालेल्या एका महिलेच्या अवयदानामुळे अनेक वर्षांपासून यकृताच्या प्रतीक्षेत असणाऱ्या व्यक्तीला नवीन आयुष्य मिळालं.

नानावटी रूग्णालयात ४० वर्षीय श्रद्धा यादव(नाव बदललेले) यांच्यावर उपचार सुरू होते. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं रक्तस्त्राव होऊ लागला होता. त्यामुळे डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना ब्रेनडेड घोषित केले. या महिलेचं यकृत अवयव प्रत्यारोपण समितीच्या नियमावलीनुसार, नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या एका व्यक्तीला दान करण्यात आले आहे.

तर २९ जानेवारी रोजी नानावटीमध्ये उपचार घेणाऱ्या ६३ वर्षीय रेखा नाईक (नाव बदलेलं) याचं यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आलं आहे. रेखा यांच्याही डोक्याला दुखापत झाल्यानं डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं. रेखा याचं यकृत मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दान करण्यात आले आहे. तर एक मूत्रपिंड बॉम्बे रुग्णालयात आणि दुसरे मूत्रपिंड जसलोक रूग्णालयात दान केलंय.

२९ जानेवारीलाचं अपोलो रुग्णालयातही एका ७० वर्षीय महिलेला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर तिचे यकृत दान करण्यात आले आहे. अपोलो रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयक समितीच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेनं अवयवदान करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी आधीच कुटुंबियांना सांगितलं होतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter