ऑटिझमग्रस्त मुलाच्या शोधासाठी वडिलांना हवी तुमची साथ!

मुंबईत कुलाब्याला राहणारा 16 वर्षीय तरूण गुप्ता 1 ऑक्टोबर रोजी तरूणच्या घराजवळून जाणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी झाला आणि बेपत्ता झाला. हा मुलगा ऑटिझमनेग्रस्त असून त्याला डोळ्यांची देखील समस्या आहे. मुलाला शोधण्यासाठी तरूणच्या वडिलांनी लोकांना मदतीचं आवाहन केलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

“आमचा मुलगा कसा आहे? कुठे आहे? याची काहीच कल्पना नाही…जिवंत आहे की नाही हे देखील मला माहित नाही…गेल्या 25 दिवसांपासून आम्ही त्याला शोधण्यासाठी वणवण भटकत आहोत…मात्र त्याचा काही पत्ता लागत नाही…जर कोणाला माझा मुलगा सापडला तर कृपया मला संपर्क साधा”

विनोद गुप्ता

3a58c796-3764-4eee-988f-64129cbc6fa5

हे शब्द आहेत एका वडिलांचे. जड अंतःकरणाने विनोद गुप्ता त्यांच्या हरवलेल्या आणि ऑटिझमने ग्रस्त असलेल्या तरूणबद्दल ते सांगत होते. 1 ऑक्टोबरपासून हरवलेल्या पोटच्या मुलाचा शोध घेण्यासाठी त्यांनी अगदी जीवाचं रान केलं आहे.

कुलाब्याला राहणारा 16 वर्षीय तरूण गुप्ता. 1 ऑक्टोबर रोजी तरूणच्या घराजवळून जाणाऱ्या रॅलीमध्ये तो सहभागी झाला आणि त्यानंतर कुटुंबियांना दिसलाच नाही. मुख्य म्हणजे तरूण लहानपणापासून ऑटिझमने ग्रस्त आहे. त्यामुळे तो जास्त बोलतही नाही. अशा परिस्थितीत मुलाला कसं शोधायचं हा प्रश्न आता गुप्ता कुटुंबियांसमोर आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना तरूणचे वडील विनोद गुप्ता म्हणाले, “तरूण ऑटिझमने ग्रस्त आहे. त्यामुळे त्याला जास्त बोलता येत नाही. याशिवाय त्याला डोळ्यांची समस्या असून त्याची दृष्टी केवळ 20 टक्के आहे. त्याचा चष्माही तुटला आहे. त्यामुळे तरूण कुठे, कसा आणि कोणत्या परिस्थितीत आहे याची आम्हाला माहिती नाही. आम्ही सोशल मीडियाद्वारे आवाहन करून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांना देखील ट्विट करून माहिती दिली आहे. तरूण लवकरात लवकर सापडला पाहिजे त्यामुळे जर तो कोणाला दिसला तर मला संपर्क करा.”

63ed2822-56a4-413b-850e-efa9cc08eb49

1 ऑक्टोबर रोजी रॅलीद्वारे तरूण सीएसटीला पोहोचला. तिथून घरी जाण्यासाठी पनवेल ट्रेन पकडली. पनवेलवरून तो पुन्हा मडगावला जाणारी ट्रेन पडकून सावंतवाडीला पोहोचला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरूणची दृश्य कैद झाली आहेत. याची माहिती मिळताच गुप्ता कुटुंबियांनी सावंतवाडीला धाव घेतली.

विनोद पुढे म्हणाले, “सावंतवाडीला पोहोचल्यावर आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर आम्हाला समजलं की तरूणने पुन्हा दादरच्या दिशेने जाणारी ट्रेन पकडली आहे. त्याला शोधण्यासाठी आम्ही आतापर्यंत चार वेळा गोव्याला जाऊन आलो आहोत. मात्र त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही. आमचं स्टेशनरीचं सामान पुरवण्याचा छोटा व्यवसाय आहे. मात्र सध्या तरूणाला शोधण्यासाठी आम्ही तो बंद ठेवला आहे.”

जर तुम्हाला तरूणची काहीही माहिती मिळाली तर खालील नंबरवर संपर्क साधा-

9819610512/7977246793

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here