‘त्या’ला झालाय मूत्राशयाचा गंभीर आजार

११ वर्षीय प्रथमचे वडील बेस्टमध्ये बस ड्रायव्हर आहेत. प्रथमचं मूत्राशय योग्य पद्धतीने विकसीत न झाल्याने त्याला दुर्मिळ आजार आहे. त्यामुळे जन्मापासूनच त्याने स्वत:हून लघवी केलेली नाही. प्रथमवर आत्तापर्यंत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.

0
147
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

“आई तू का घाबरतेस, मी बरा होणार आहे” आईशी बोलताना हे शब्द आहेत खोडकर पण हुशार ११ वर्षांच्या प्रथमचे.

मुंबईतील ११ वर्षांचा प्रथम केदार जन्मापासूनच एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. प्रथमला जन्मापासून स्वतःहून कधीच लघवी करता आली नाही. त्याच्या आजारामुळे सध्या प्रथमचे आई-वडील देखील चिंतेत आहेत.

प्रथम केदार
प्रथम केदार

११ वर्षांचा प्रथम खूप उत्साही आणि हुशार मुलगा आहे. प्रथमचे वडील ‘बेस्ट’मध्ये ड्रायव्हर आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रथमला ‘ब्लाडर एक्ट्रोफी’नावाचा दुर्मिळ आजार आहे. या आजारात मूत्राशय योग्य पद्धतीने विकसीत झालेलं नसल्याने शरीरातून लघवी बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना प्रथमच्या आई सारिका सांगतात की, “आम्ही प्रथमचे उपचार करण्यासाठी मुंबईतील जवळपास सर्व बालरोगतज्ज्ञांकडे गेलो. मात्र त्यापैकी एकाही डॉक्टरांनी प्रथम बरा होईल याची खात्री दिली नाही. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, त्याला पुढील संपूर्ण आयुष्य ट्यूबच्या सहाय्याने लघवी करावी लागेल.”

सारिका पुढे सांगतात की, मी “अजूनही असा डॉक्टर शोधतेय जो मला सांगू शकले की प्रथम बरा होईल. प्रथमवर आतापर्यंत २ शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.”

याविषयी कोकिलाबेन धिरूभाई अंबानी रूग्णालयाचे युरोलॉजीचे डॉक्टर संजय पांडे सांगतात की, प्रथमला ‘ब्लाडर एक्ट्रोफी’ हा आजार आहे. या आजारात जन्मापासूनच मूत्राशय विकसीत होत नाही. म्हणजे मूत्राशय़ात फक्त ५०-१०० मिली लघवी साठवण्याची क्षमता असते.”

डॉ.पांडे पुढे सांगतात की, “मी माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास ३०-३५ या आजाराने ग्रस्त रूग्ण पाहिलेत.”

येत्या २० सप्टेंबरला डॉक्टर प्रथमची पुन्हा वैद्यकीय चाचणी करणार आहेत. यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाईल.

प्रथमचे वडील ‘बेस्ट’मध्ये ड्रायव्हर आहेत. त्यामुळे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. याविषयी सांगताना सारिका म्हणाल्या, “प्रथमवर ऑगस्टमध्ये एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेचा आणि त्याच्या औषधांचा संपूर्ण खर्च ७ लाख रूपये झालाय.”

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)