विरुद्ध आहार घेतल्यानं शरीराची होते हानी, जाणून घ्या विरुद्ध आहाराविषयी

आयुर्वेदात विरुद्ध आहाराची संकल्पना आहे. विरुद्ध आहार म्हणजे दोन पदार्थांचं एकत्र सेवन करणे. जाणून घ्या कुठले पदार्थ एकत्र खाल्ल्यानं शरीराची होते हानी

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

शरीरस्वास्थ्यासाठी संतुलित आहार अत्यंत गरजेचा आहे. शरिराची झालेली झीज ही आहारतून मिळणाऱ्या पोषणामुळेच भरुन निघते. मात्र काही चुकीच्या गोष्टींच्या सेवनामुळे शरीराची हानी होते. आयुर्वेदात विरुद्ध आहार ही संकल्पना आहे. काही पदार्थांचं सोबत सेवन केल्यामुळे अनेक व्याधींची लागण होण्याची शक्यता असते. वेगवेगळे खाल्ल्यास हे पदार्थ अत्यंत पौष्टिक असतात. पण त्यांचं एकत्रितरित्या सेवन टाळायला हवं. या पदार्थांच्या प्रतिकूल संयोगानं काही विशिष्ट द्रव्य निर्माण होतात. ही द्रव्य शरीराचे घटक बनू शकत नाहित. शरीर यांना आत्मसात करु शकत नाही. विरुद्ध आहाराच्या परिणामस्वरुपी, गजकर्ण, कोड, सोरायसिस किंवा महारोगाची बाधा होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया आयुर्वेदानं सांगितलेला विरुद्ध आहार

साजूक तूप आणि मध

या दोन्ही पदार्थांच समप्रमाणात सेवन कधीही करु नये. यामुळे दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता असते.

मध आणि गरम पाणी

मधामुळे आणि गरम पाण्यामुळे वजन कमी होतं. मात्र मध आणि गरम पाणी यांचं एकत्र सेवन केल्यास त्वचेचे दोष उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय दृष्टीदोषही उद्भवू शकतो. वजन वाढू नये म्हणून गरम कॉफीमध्ये साखरेऐवजी मध घालून पिण्याची प्रथा प्रचलित झाली आहे. मात्र ही गोष्ट शरीरासाठी हानीकारक आहे.

दूध आणि मीठ

दुध आणि मिठाच्या संयोगामुळे रक्तदोष निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय हाडं आणि मज्जासंस्थावर याचा परिणाम होतो. यामुळे सांध्यांना सूज येणे, नजर कमजोर होणे, शुक्रधातू क्षीण होणे यांसारखे आजार होऊ शकतात.

दुध आणि फळं

फ्रूट सॅलड, मिल्क शेक किंवा केळ्याचं शिकरण सगळ्यांचेच आवडते पदार्थ आहेत. मात्र दुध आणि फळ्यांचं एकत्र सेवन करणं शरिरासाठी घातक ठरु शकतं. यामुळे त्वचेचे अनेक रोग संभवतात. याशिवाय दुधाबरोबर माश्यांचंही सेवन करु नये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter