तुम्ही योग्य पद्धतीनं स्नान करताय ना?, जाणून घ्या आयुर्वेदात सांगितलेली स्नानाची योग्य पद्धत

आंघोळ केल्याचा सकारात्मक परिणाम मनावरही होतो. शरीराच्या शुद्दीच्या भावनेनं मनही प्रसन्न बनतं. शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी आंघोळीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सोर्स- जीवन मंत्रा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आंघोळ आपण रोजच करतो. दिनचर्येतला एक भाग म्हणून आंघोळीचा विधी उरकला जातो. स्नानाचं म्हणजेच आंघोळीचं निरोगी आरोग्यासाठी असलेलं महत्त्व आयुर्वेदात बारकाईनं सांगितलं आहे. आंघोळ करताना पाण्याचा त्वचेशी संपर्क येतो. यामुळे शरिरावर साठलेले क्षार पाण्यात विरघळल्याने निघून जातात. आंघोळीमुळे रक्ताभिसरण क्रियाही सुधारते आणि त्वचा सतेज बनते. स्नानामुळे भूकही वाढते.

आंघोळ केल्याचा सकारात्मक परिणाम मनावरही होतो. शरीराच्या शुद्दीच्या भावनेनं मनही प्रसन्न बनतं. शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी आंघोळीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र आरोग्याला याचे उचित फायदे होण्यासाठी आयुर्वेदानं काही सुचना केल्या आहेत.

सहन होईल एवढंच पाण्याचं तापमान ठेवा

कोमट किंवा त्यापेक्षा थोडं अधिक गरम पाणी स्नानासाठी योग्य ठरतं. यामुळे त्वचेवरचा मळ निघतो आणि त्वचेची छिद्र विस्तृत होतात. त्वचा मृदू होते आणि मन उत्साही बनतं.

थंड पाण्याचा वापर टाळा

थंड पाण्याने त्वचेच्या छिद्रांची तोंडं संकुचित होतात. त्यामुळे शरीरावरचा मळ नीट निघत नाही. थंड पाण्याने वाताची समस्या बळावते.

या लोकांनी स्नान टाळावं

काही शारीरीक व्याधींमध्ये स्नान न करणं हितकारक आहे. डोळे आलेले असल्यास, सर्दी झालेली असल्यास आणि अजीर्ण झालेलं असल्यास स्नान करणं टाळावं. तसंच, जेवण करुन लगेचच आंघोळ करणं टाळा. यामुळे अन्नाचं पचन नीट होत नाही.

साबणाऐवजी उटण्याचा वापर करावा

कृत्रिम साबणाच्या अतिरिक्त वापरानं त्वचा रुक्ष बनते. त्यामुळे साबणाऐवजी त्रिफळा चूर्ण, मसुर आणि चण्याच्या डाळीचं पीठ लावून आंघोळ करावी. त्वचा रुक्ष असेल तर, अनंतमुळ, मंजिष्ठा, अगरु, नागरमोथा, नीम, त्रिफळा ह्यांपासून बनवलेल्या उटण्याचा वापर करावा.

केस धुताना ही काळजी घ्या

डोक्यावरुन पाणी घेताना कोमट पाण्याचाच वापर करावा. अन्यथा केस गळण्याची समस्या आणि दृष्टिदोष निर्माण होते. याचसोबत केस धुण्यासाठी शिकेकाई, आवळा, मेंदी आणि मेथी पावडर एकत्र करुन बनवलेल्या मिश्रणाचा वापर करावा. आंघोळीनंतर पंख्याखाली केस वाळवू नये. यानं केसांना फाटे फुटतात

अति थंड किंवा अति गरम पाण्याचा वापर टाळा

अति थंड पाणी हिवाळ्यात वापरल्यास वात आणि कफ उत्पन्न होतो. यामुळे सांधे जखडणे, मुंग्या येणे, सर्दी-खोकला होणे ह्या व्याधी होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात अति गरम पाणी वापरल्यास त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, आग होणे, त्वचा लालसर होणे, यांसारख्या समस्या होऊ शकतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter