जाणून घ्या धकाधकीच्या जीवनशैलीतलं आयुर्वेदाचं महत्त्व

आपल्या शरीराला अनेक व्याधींची बाधा होते. या व्याधींवर घाईघाईनं औषधोपचार करण्याची आपली मानसिकता असते. मात्र इथेच आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचं महत्त्व अधोरेखित होतं.

सोर्स- रेडिफ
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

धावपळ आणि ताणतणाव हे आधुनिक जीवनशैलीतले अविभाज्य घटक बनलेत. यामुळे आपल्या शरीराला अनेक व्याधींची बाधा होते. या व्याधींवर घाईघाईनं औषधोपचार करण्याची आपली मानसिकता असते. मात्र इथेच आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचं महत्त्व अधोरेखित होतं. आयुर्वेद अनेक आजारांचा मुळासकट नाश करतो.

इतर वैद्यकीय शास्त्रांचा प्रसार झाल्यावरही आयुर्वेदाचं महत्त्व टिकून राहिलंय. याचं मुख्य कारण म्हणजे आधुनिक जीवनशैलीमुळे आपण निसर्गापासून दुरावत चाललोय. निसर्गाच्या सान्निध्यातल्या वनौषधींच्या वापरानं आपल्या शरीराल नवसंजीवनी मिळते.

आयुर्वेदाचं स्थानं पुनरुज्जीवित करण्यात इंटरनेटचाही मोठा वाटा आहे. इंटरनेटमुळे आयुर्वेद फक्त भारतापलिकडे परदेशातही जाऊन पोहोचलाय आणि मोठया प्रमाणावर परदेशी नागरिक आयुर्वेदिक उपचार करुन घेण्यासाठी भारताची वाट धरताहेत.

स्वस्थ तन आणि मनासाठी, धकाधकीच्या व्यस्त जीवनशैलीतून स्वत:साठी थोडा वेळा काढणं गरजेचं आहे. याचसोबत आयुर्वेदात दिलेली जीवनशैली अवलंबल्यास निरोगी आयुष्य जगण्याचा मार्ग सुकर होईल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter